`शिवसेनेने ठरवलं तर त्यांना सत्ता स्थापन करणे अवघड नाही`

राष्ट्रवादीने सूचकपणे शिवसेनेला आपला पाठिंबा आणि मदत जाहीर करण्याचे सूरूच ठेवले आहे..
`शिवसेनेने ठरवलं तर त्यांना सत्ता स्थापन करणे अवघड नाही`

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसने शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम सुरूच ठेवले असून शिवसेनेनं ठरवलं तर त्यांना सत्ता स्थापन करण अवघड नाही, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिला आहे. विधानसभेत भाजपचा अध्यक्ष होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आव्हान दिले.

 वाघाला हत्तीचं बळ मिळालं आहे. ते आता समोर येऊन स्पष्ट होऊ द्या, असे सूचक आवाहनही त्यांनी शिवसेनेला केले.

याबाबत मलिक यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे

- भाजप बहुमत सिद्ध करू शकला नाही तर आम्ही स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू.
- भाजपच सरकार कोसळलं तर आम्ही प्रयत्न करू.
-सुधीर मुनगंटीवार लोकांना घाबरवण्यासाठी म्हणत आहे की सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल
-  विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. ती तारीख फार लांब आहे. त्याच्या आतच बदल होतील.
- विधानसभेत भाजपचा अध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणार. त्यासाठी सभागृहात व्यवस्थापन करू.
- सर्वांची मदत घेऊन आमचा अध्यक्ष बनवू
- भाजपला जमत नसेल तर त्यांनी पर्यायी सरकार स्थापन करायला सांगावे.
- दिल्लीच्या तख्तासमोर आम्ही झुकणार नाही. आता  शिवसेनेच्या नेत्यांनी झुकायचं की आपला स्वाभिमान ठेवायचा हे ठरवावे.
- वाघाला हत्तीचं बळ मिळाल आहे. त्यामुळे वाघ आता थांबायला तयार नाही,
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com