विधानसभेसाठी युती झाल्यास पंकज भुजबळांची जागा शिवसेनेला सोपी?

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीविषयी लोकप्रतिनिधी आशावादी आहेत. त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होईल.
Pankaj Bhujbal
Pankaj Bhujbal

नाशिक : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीविषयी लोकप्रतिनिधी आशावादी आहेत. त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होईल. हे पक्ष 2014 मध्ये स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे गेले होते. त्यावेळी त्यांना मिळालेली मते पाहता शिवसेना-भाजप युतीच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये पंकज भुजबळ यांची नांदगाव मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळण्याची चिन्हे आहेत. 

विधानसभेच्या निवडणुकीत 2014 मध्ये दोन्ही काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढविली होती. नाशिक जिल्ह्यात शिवसेना भाजपचे मताधिक्य (कंसात) खालील प्रमाणे होते

सिन्नर- राजाभाऊ वाजे (20,554), निफाड- अनिल कदम (3,921), मालेगाव बाह्य- दादा भुसे (37,421) आणि देवळाली- योगेश घोलप (25,171), भाजपला नाशिक पूर्व - बाळासाहेब सानप (46,374), नाशिक मध्ये- देवयानी फरांदे (28,272), नाशिक पश्‍चिम- सीमा हिरे (29,670), चांदवड- डॉ. राहुल आहेर (11,161) या आठ जागा युतीला मिळाल्या होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसला येवला- छगन भुजबळ (46,442), नांदगाव- पंकज भुजबळ (18,436), दिंडोरी- नरहरी झीरवाळ (12,633), बागलाण- दीपिका चव्हाण (4,181) तसेच काँग्रेसला मालेगाव मध्य- शेख आसीफ (16,151) आणि इगतपुरी- निर्मला गावीत (10,377), कळवण - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे. पी. गावीत (4,786) अशा उर्वरित जागा होत्या.

यापूर्वीच्या मतदानाचा विचार करता काँग्रेसला 3,32,357, राष्ट्रवादी काँग्रेसला 6,69,485 अशी आघाडीला 10,01,485 तसेच शिवसेनेला 6,59,089 आणि भाजपला 6,04,247 अशी युतीला 12,63,336 मते मिळाली होती. मनसे- 91,795, बहुजन समाज पार्टीला 8,428 तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला 84,654 मते मिळाली होती. सहकारी पक्षांची मते एकमेकांमध्ये वर्ग झाल्यास कम्युनिस्ट पक्षाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर नांदगाव येथील पंकज भुजबळ यांचा नांदगाव मतदारसंघ शिवसेनेला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे युती झाल्यास शिवसेनेचा लाभ होईल. त्यामुळे आपला मतदारसंघ 'सेफ' होण्यासाठी आमदार, खासदार युती व्हावी या मताचे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com