माझी जमीन विकेन पण कामगारांचे पैसे देईल : खासदार सुजय विखे

आज (गुरुवारी) कामगारांना थकित एक महिन्याचे वेतन व 'लेआॅफ' काळातील ५० टक्के रकमेचे एक वेतन तत्काळ दिले जाईल. येत्या २० जानेवारीला थकित एक महिन्याचे वेतन व 'लेआॅफ' काळातील दोन महिन्याचे वेतन अदा केले जाईल. असे खासदार डॉ. विखे यांनी कामगारांशी चर्चा करून जाहीर केले. नंतर, कामगारांनी उपोषण मागे घेतले.
dr-sujay-vikhe ready to sell his land and pay workers
dr-sujay-vikhe ready to sell his land and pay workers

राहुरी (नगर)  :   "तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांना उपोषणाची वेळ आली. याचे दुःख आहे. बंद पडलेला कारखाना सुरू करताना अत्यल्प वेतनावर कामगारांनी सहकार्य केले. याची जाणीव आहे. माझ्या कार्यकाळातील थकलेला एक रुपयाही बुडणार नाही. याची मी वैयक्तिक हमी देतो. प्रसंगी माझी जमीन विकून पैसे देईल. ती माझी जबाबदारी आहे.

फक्त थकबाकी द्यायला काही कालावधी लागेल. त्याचे लिखित शेडयूल ठरवून, त्यावर मी स्वतः स्वाक्षरी करील. ठरल्याप्रमाणे वागलो नाही. तर, खासदार पदाचा राजीनामा देईल. कामगारांना आंदोलन करण्याची वेळ पुन्हा येणार नाही." अशी ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी कामगारांनी उपोषण मागे घेतले.

    विविध मागण्यांसाठी डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कायम, हंगामी व निवृत्त कामगारांनी मंगळवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. राहुरी फॅक्टरी येथे उपोषणस्थळी भेटीप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. विखे बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, संचालक मच्छिंद्र तांबे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, सचिव भरत पेरणे, उपोषणकर्ते सुरेश थोरात, अर्जुन दुशिंग, सचिन काळे, इंद्रभान पेरणे, चंद्रकांत कराळे, सुनिल गुलदगड उपस्थित होते.

    खासदार डॉ. विखे म्हणाले, "वैद्यकीय कारणामुळे उपोषणस्थळी येण्यास दोन दिवस उशीर झाला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारखान्याचे कामगार हे माझ्या कुटुंबातील घटक आहेत. ऊस टंचाईमुळे यंदा राहुरी व गणेश कारखाना बंद ठेवला. येत्या दोन दिवसात कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन, जिल्हा बँकेचे कर्ज, कामगारांची थकीत देणी याविषयी चर्चा करू. कायम, हंगामी व निवृत्त कामगारांचे शिष्टमंडळ तयार करा. त्यांच्या बरोबर चर्चा करून, कोणत्या महिन्याच्या कोणत्या तारखेला किती थकीत देणी दिली जाईल. याचे शेडयूल तयार केले जाईल. कारखाना वाचविण्यासाठी कामगारांनी सहकार्य करावे." असे आवाहन डॉ. खासदार विखे यांनी केले.

असे ठरले...!
     आज (गुरुवारी) कामगारांना थकित एक महिन्याचे वेतन व 'लेआॅफ' काळातील ५० टक्के रकमेचे एक वेतन तत्काळ दिले जाईल. येत्या २० जानेवारीला थकित एक महिन्याचे वेतन व 'लेआॅफ' काळातील दोन महिन्याचे वेतन अदा केले जाईल. असे खासदार डॉ. विखे यांनी कामगारांशी चर्चा करून जाहीर केले. नंतर, कामगारांनी उपोषण मागे घेतले.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com