मनसे ही भाजपची बी टीम नसेल : राष्ट्रवादीच्या या नेत्याचे मत

....
jayant patil about mns
jayant patil about mns

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आता महाविकास आघाडी सरकारला सक्षमपणे विरोध करण्यासाठी शॅडो कॅबिनेट स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या कल्पनेचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्वागत केले असून भाजपपेक्षा मनसेने अधिक सक्षमपणे काम केले तर आमची डोकेदुखी कमी होईल, असे मत व्यक्त केले.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. मनसेने आपला भगवा झेंडा केला आहे. त्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले की 

कोणता झेंडा असावा हा त्यांचा निर्णय आहे.  झेंड्यापेक्षा विचार महत्वाचा असतो. यापूर्वी त्यांनी मराठी माणूस अशी टोकाची भूमिका घेतली. त्यानंतर मोदींच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांची दिशा भाजपविरोधी होती आणि यापुढेही ती राहील, अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रभर जी भूमिका मांडली त्या विरोधात ते आता भूमिका मांडणार नाही. त्यांनी भाजपशी विचार जुळवून घेतले तर ती प्रतारणा ठरेल, असेही पाटील यांनी स्पष्टपणे मत मांडले. मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करेल, असे वाटत नाही.

भाजपपेक्षा मनसेने अधिक सक्षमपणे काम केले तर आमची डोकेदुखी कमी होईल.विरोधाला विरोध न करता राज्याच्या विकासाची भूमिका घेणे महत्त्वाचे आहे.  महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी भूमिका घेणार असाल तर त्यांचे स्वागत असल्याचे पाटील म्हणाले.सावरकर फोटो आला म्हणजे कडवे हिंदुत्व हा गैरसमज असल्याचेही त्यांनी सांगितले. भगवा झेंडा म्हणजे कडवे हिंदुत्व पण नाही
शिवसेनेनही आपले हिंदुत्व सोडलं नाही. कोणीही आपले विचार सोडलेले नाहीत, हे त्यांनी आग्रहाने मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com