माझ्याकडे गृह खाते असते तर आज चित्र वेगळे असते : पृथ्वीराज चव्हाण

माझ्याकडे गृह खाते असते तर आज चित्र वेगळे असते : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : "युती सरकारच्या काळात भाजपने शिवसेनेला गंडविले आणि गृहमंत्री पद स्वत;कडे ठेवले. ती चूक आमची देखील झाली. मी मुख्यमंत्री असताना गृहमंत्रिपद माझ्याकडे ठेवले असते, तर आज चित्र वेगळे असते,' असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. 

""मोदी सरकारला चाळीस महिने पूर्ण झाले. केवळ घोषणांच्या पलीकडे काहीही केले नाही,' अशी टीका करतानाच " कॉंग्रेस रस्त्यावर उतरण्यात कमी पडते आहे,' अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली. 

महाराष्ट्र मिडीयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात " सध्याची राजकीय परिस्थिती आणि माध्यमांची भूमिका' या विषयावर चव्हाण यांची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी वैयक्तिक आवडी निवडीपासून ते मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेल्या चुका आणि केलेली कामे, पंतप्रधान कार्यालयातील अनुभव यांच्यावर सविस्तर भाष्य केले. त्याच वेळी केंद्रातील मोदी सरकारच्या आणि राज्यातील भाजप सरकार त्यांनी टीका केली. 

समविचारी पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वक्तव्यावर " त्यांचे आणि माझे कितीही मतभेद असले, तरी मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कर्जमाफीसाठी आम्ही एकत्र संघर्ष यात्रा काढल्यानंतर त्यांचा परिणाम झाला.आजचे अंकगणित पाहता कॉंग्रेस हा मोठा पक्ष असला तरी एकटा टिकणे शक्‍य नाही. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सरकारला पाठिंबा आहे की विरोधात आहे, हेच अजून स्पष्ट होत नाही,' अशा शब्दात चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले. 

कॉंग्रेसकडे खंबीर नेतृत्व नसल्यामुळे 2019 पुन्हा भाजप सरकार येणार या प्रश्‍नावर बोलताना चव्हाण म्हणाले." यातले निम्मे खरे आहे. सवंग लोकप्रियेतासाठी घोषणा करण्यापलीकडे मोदी सरकारने काही केलेले नाही. त्यांनी घेतलेले सर्व निर्णय फसले आहे. परंतु मोदी हे उत्कृष्ट वक्ते आहेत, हिंदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडीयावर त्यांची उलटी गणती सुरू झाली आहे,' असे सांगत त्यांनी नेमके उत्तर देणे टाळले. 

मुख्यमंत्री म्हणून देवेंद फडणवीस आणि त्यांच्यातील फरक विचारला असता, चव्हाण म्हणाले,"" त्यांच्याकडे बहुमत चांगले आहे. मनाप्रमाणे खाती मिळाली आहेत. पक्षातील विरोधक दूर करण्यात त्यांना यश आले आहे. गृहखातेही त्यांच्याकडेच आहे. पण सहकारी चांगले नसल्यामुळे त्यांना चांगले काम करता येत नाही. त्यांच्या मध्ये आणि माझ्या मध्ये हा मोठा फरक आहे. मी मुख्यमंत्री असताना गृहखाते माझ्याकडे नव्हते. ते असते, तर खूप फरक पडला असता. 1999 मध्ये आघाडीमध्ये जी वाटणी झाली, त्यांची माहिती मला नव्हती. त्यावेळी देशात ज्या ज्या राज्यांमध्ये आघाडीचे सरकार होते, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते होते. युती सरकारच्या काळात भाजपने शिवसेनेला गंडविले आणि गृहमंत्रिपद स्वत:कडे ठेवले. तीच चूक आम्हाला भोवली. आता पुन्हा आघाडीचे सरकार आले, तर ही चूक होणार नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com