if governor calls congress alliance | Sarkarnama

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पाचारण केले गेले तर शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होणार?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळताच शिवसेनेची भूमिका काय हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मुंबई: सरकारिया आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार निवडणूकपूर्व युती म्हणजे एक पक्ष असे काही घटनातज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष या नात्याने भाजपला निमंत्रण मिळाले तर देवेंद्र फडणवीस पक्षनेते या नात्याने शिवसेनेला पाठिंब्याची विनंती करणारे पत्र पाठवू शकतात. यावर सेना नेमकी काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरेल.

दरम्यान सत्तास्थापनेचे निमंत्रण स्वीकारुन भाजपने शपथविधीनंतर विश्‍वासमतास सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात मतदान करणार आहे. शिवसेनेनेही विरोधात मतदान केले तर त्यांच्याशी आघाडी करण्याचा विचार करायचा काय, यावर पक्ष निर्णय घेईल असे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेने जर भाजपला मतदान करायचे नाही असे ठरवले तर त्यांनी युती तोडली असे चित्र निर्माण होईल. निवडणूकपूर्व आघाडीला निमंत्रण देण्याचा सरकारीया आयोगाचा निर्णय स्वीकारल्यास भाजपच्या नकारानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला पाचारण करावे लागेल. त्या वेळी शिवसेनेने त्यांना पाठिंबा दयायचे ठरवल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद कसे मिळेल, असा प्रश्‍न केला जातो आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख