वीज ग्रीडमध्ये काही अडचण आल्यास `कोयना` मदतीला येणार....

महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी लगबग
koyna
koyna

मुंबई : देशभरातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हणजेच उद्या (ता.५) रोजी देशातील जनतेला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करून मेणबत्त्या, पणत्या व मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल ग्रीडची सुव्यवस्था कायम राहावी त्यामध्ये तांत्रिक बिघाड होऊ नये तसेच राज्यातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.

राऊत यांनी यासंदर्भात एक पत्रही लिहिले आहे. महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक ग्रीडची सुव्यवस्था कायम ठेवत ग्रीडमधील बिघाड टाळण्यासाठी तसेच नागरिकांना अखंडित, सुरळीत व पूर्ववत विजेचा पुरवठा ठेवण्याकरिता ऊर्जा विभाग, प्रामुख्याने महानिर्मीती, महापारेषण, महावितरण व राज्य भार प्रेषण केंद्र यांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व केंद्रांच्या वरिष्ठ अधिका-यांना तातडीने निर्देश देण्यात यावेत असे राऊत यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सिंग यांची राऊत यांच्याशी चर्चा
केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या आवाहनानुसार पथदिवे, घरगुती उपकरणे जसे टीव्ही, संगणक, फ्रिज आणि एअर कंडिशनर हे बंद करण्यात येणार नाहीत. फक्त घरातील लाईट/दिवे बंद करण्यात यावे असे म्हटले आहे, असे सिंग यांनी नमूद केले. ५ एप्रिल रोजी रात्री एखादी आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पासह २ हजार ५८५ मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत केंद्रातून आपल्याला तात्काळ वीजनिर्मिती करता येईल, त्यामुळे पश्‍चिम ग्रीडचे संतुलन राखणेही सोपे होईल असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com