`ब्रिटिश भारतात आलेच नसते तर शिवाजी महाराजांच्या धोरणानुसार देश चालला असता...`

`ब्रिटिश भारतात आलेच नसते तर शिवाजी महाराजांच्या धोरणानुसार देश चालला असता...`

पुणे : ब्रिटिश भारतात आलेच नसते तर काय झालं असतं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. ब्रिटिश भारतात आले हे आपलं भाग्यच आहे, अशी समजणारी एक पिढी होती. हाच जरतरचा प्रश्न प्रसिद्ध लेखक आणि काॅंग्रेसचे खासदार शशी थरूर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी देशावर मराठा साम्राज्य असतं आणि या साम्राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने लोकशाही आणि सर्वधर्म समभावानुसार राज्य केले असते, असे उत्तर त्यांनी दिले.

एका कार्यक्रमात झालेल्या प्रश्नोत्तराच्या वेळी त्यांनी हे भाष्य केले. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.  त्यांनी त्यासाठी काही तर्क सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार इंग्रज येण्यापूर्वी मराठा साम्राज्य दक्षिणेत तंजावर, पूर्वेकडे कोलकत्त्यापर्यंत पसरले होते. दक्षिणेतील सांबर ही डिशसुद्धा तंजावरचे राजे संभाजी यांच्यामुळे उदयास आल्याचे त्यांनी सांगितले. 

अफगाणिस्तानचा अहमदशहा अब्दाली याने पानिपतात मराठ्यांचा पराभव करून मोठी लूट नेली. पण त्याला या देशावर राज्य करायचे नव्हते. त्यामुळे मुघल बादशहा आणि प्रत्यक्षात कारभार हा मराठ्यांच्या हाती, अशी स्थिती देशात आली असती. मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या मार्गाने राज्य केले असते. लढाईत जर कुराण सापडले तर ते जपून मुस्लिम माणसाच्या हाती हवाली करण्याचे आदेश शिवाजी महाराजांचे होते. त्यांचा कारभार हा सर्वधर्मसमभाव जपणारा होता. त्या पद्धतीने राज्यकारभार झाला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जपानसारखी पद्धत देशात आली असती. कालांतराने या राजांनी आधुनिक सोयीसुविधा पुरविल्या असत्या. देशात लोकशाहीदेखील अस्तित्त्वात आली असती, असे त्यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com