अजित पवार यांची दौंडमध्ये सभा झाली असती तर....

अजित पवार यांची दौंडमध्ये सभा झाली असती तर....

केडगाव ः दौंड विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना विजयासाठी अखेरपर्यंत झगडावे लागले. राहुल कुल हे 673 मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार रमेश थोरात यांनी कुल यांना अखेरपर्यंत झुंजवले. पुणे जिल्ह्यात भाजप-शिवसेनेतील प्रस्थापितांचा दणदणीत पराभव होत असताना कुल यांनी मिळविलेला विजय महत्वाचा मानला जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा झंजावात कुल यांना रोखू शकला नाही.

भाजपची स्थापना झाल्यानंतर दौंडमध्ये प्रथमच कमळ फुलले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाऐवजी भाजपची उमेदवारी घेतल्याने कुल यांना विजयासाठी अखेरपर्यंत झगडावे लागले. तालुक्‍यात 1400 कोटी रूपयांची विकासकामे, मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा, प्रचार यंत्रणेतील आघाडी असतानाही कुल यांना अपेक्षित मताधिक्‍य घेता आले नाही. लोकसभा निवडणुकीत आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना दौंड तालुक्‍यातून 7053 मतांची आघाडी मिळाली होती. हे मताधिक्‍यसुद्धा कुल यांना राखता आले नाही.

रासपची उमेदवारी न घेतल्याने कुल यांच्यापुढील अडचणी प्रांरभी वाढल्या होत्या. आनंद थोरत, महेश भागवत, नंदू पवार, राजाराम तांबे, ज्ञानेश्वर शेळके यांच्या भाजपप्रवेशामुळे कुल यांना मताधिक्‍य मिळाले नाही मात्र किमान त्यांना विजयापर्यंत हे पदाधिकारी घेऊन गेले. असे दिसते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुल यांना दुप्पट मताधिक्‍यांनी निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो असे आश्वासन प्रचारा दरम्यान दिले होते. मात्र हा मुद्दा मतदारांना भावला नाही. हे निकालावरून स्पष्ट होत आहे.

माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या कार्यकाळात 426 कोटी रूपयांचा विकासकामे केल्याचा दावा केला होता. तरीही त्यांचा पराभव झाला होता. कुल यांनी त्यांच्या कार्यकाळात 1440 कोटी रूपयांचा विकास केल्याचा दावा केला आहे. मात्र विकासकामांचे प्रतिबिंब मतदानात उतरत नाही हेच या निकालावरून दिसून येत आहे.
कुल यांचे विकासकामातील सातत्य, मुख्यमंत्र्याचा पाठिंबा, दिग्गज मंडळींनी राष्ट्रवादीला केलेला रामराम, कुल यांना मंत्रीपदाचे आश्वासन या कुल यांच्या जमेच्या बाजू असल्याने राष्ट्रवादीत मरगळ आली होती. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वरवंड येथील सभेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला

 या सभेपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला. हा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. त्याचा थोरात यांना फायदा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा दौंडमध्ये झाली नाही. त्याचाही फटका थोरात यांना बसला. खासदार अमोल कोल्हे यांची यवत येथील सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र यवत परिसरात थोरात यांना अपेक्षित मताधिक्‍य मिळाले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com