इचलकरंजीत भाऊ गटाचा  सोमवारी  भाजपमध्ये प्रवेश

उद्योगपती सतिश डाळ्या व माजी उपनगराध्यक्ष सुनिल महाजन यांच्या नेतृत्वाखालील हा गट गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला होता. त्यातच माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अनेक तर्क-वितर्काला उधाण आले होते. यातील कांहीजण कॉंग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा शहरात होती.
BJP Flags
BJP Flags

इचलकरंजी :  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भाऊ गटाचा सोमवारी (ता. 9) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार आहे. आज या गटाची बैठक झाली. यावेळी 17 जण पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या बदललेल्या भूमिकेनंतर विविध तर्क-वितर्क करण्यात येत होते. भाऊ गटातील काहीजण परत कॉंग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा होती. पण आजच्या निर्णयानंतर या चर्चेला पूर्ण विराम मिळणार आहे.

उद्योगपती सतिश डाळ्या व माजी उपनगराध्यक्ष सुनिल महाजन यांच्या नेतृत्वाखालील हा गट गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला होता. त्यातच माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अनेक तर्क-वितर्काला उधाण आले होते. यातील कांहीजण कॉंग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा शहरात होती.

पण ही चर्चा आता थांबणार आहे. भाऊ गटाची आज बैठक झाली. बैठकीला 17 जण उपस्थीत होते. या गटाची सोमवारी (ता. 9) मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थीतीत पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांची उपस्थीती असणार आहेत. प्रवेश करणाऱ्यांमध्ये तीन माजी उपनगराध्यक्ष, तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com