icc | Sarkarnama

"आयसीसी'चे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा राजीनामा 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मार्च 2017

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये
(बीसीसीआय) न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची प्रक्रिया सुरू असताना मनोहर यांच्या राजीनाम्याने भारतीय क्रिकेट जगताला पुन्हा धक्का बसला आहे. 

नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये
(बीसीसीआय) न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची प्रक्रिया सुरू असताना मनोहर यांच्या राजीनाम्याने भारतीय क्रिकेट जगताला पुन्हा धक्का बसला आहे. 

शशांक मनोहर ज्येष्ठ विधिज्ञ असून विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे (व्हीसीए) अध्यक्ष व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपदही भूषविले आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काही महिन्यापूर्वीच दुबई येथे मुख्यालय असलेल्या आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारले होते. याच काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे न्या. लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयचा कारभार चालविण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
मनोहर यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याचे कारण समजू शकले नाही. "व्यक्तिगत' कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु यामागे न्या. लोढा समितीच्या शिफारशी कारणीभूत असाव्या, असे बोलले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख