फडणविसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदलीवरून मतभेद 

 फडणविसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदलीवरून मतभेद 

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या जवळ असलेले प्रवीण दराडे, ब्रिजेश सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. तसेच त्यांच्या मर्जीतील सचिव संजीव जैस्वाल यांची नियुक्ती वरून मतभेद सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने 22 IAS अधिकारांच्या बदल्या केल्या आहेत. 

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची ही बदली अपेक्षित आहे. ते म्हाडासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते,पण फडणवीस यांच्या जवळचे असल्याने त्यांची नियुक्ती होण्यास विरोध आहे,अशी चर्चा मंत्रालयात आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीची ऑर्डर अजून निघाली नसल्याची माहिती आहे. 

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर गेल्या सरकार मधील सचिवांना हे सरकार महत्वाच्या खात्याचा अधिभार देतील का हीच चर्चा आता सुरू झालीये. जैस्वाल आणि शिवसेनेच्या महापौर यांच्यातही खटके उडाले होते. सध्या म्हाडाचा चार्ज मिलिंद म्हैसकर यांच्याकडे आहे  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com