BDO वाघप्रकरणी IAS भारुड आक्रमक; दोषींच्या अटकेची मागणी!  - IAS bharud on bado wagh | Politics Marathi News - Sarkarnama

BDO वाघप्रकरणी IAS भारुड आक्रमक; दोषींच्या अटकेची मागणी! 

सरकारनामा ब्युराे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पुणे : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक सुरू असताना विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे टोकाचे पाऊल त्यांनी राजकीय लोकांच्या त्रासातून उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आक्रमकपणे आवाज उठवला आहे. 

पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांनी गटविकास अधिकारी श्री. वाघ यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. गुरुवारी ते आपल्या कार्यालयात आलेले असताना मिटिंग हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांची मासिक बैठक सुरू होती. यावेळी अचानक गटविकास अधिकारी श्री. वाघ हे आपल्या कॅबिनमधून आले व त्यांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शहरातील देवरे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सद्या त्यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असून प्राप्त माहितीनुसार श्री. वाघ यांच्या खिशात सुसाईड नोट असल्याचे समजते. 

दरम्यान, एखांद्या बीडीओवर आत्महत्त्या करण्याची वेळ येते, ही बाब भूषणावह नाही. शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनांनीही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असलेले आयएएस अधिकारी राजेंद्र भारुड यांनी ठोस भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मिडीयावरील पोस्टद्वारे या घटनेचा निषेध केला आहे. याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख