मंत्री होण्याचा मान आढळरावांना; मी उद्धव आणि सीएमशी बोलणार : जानकर

मंत्री होण्याचा मान आढळरावांना; मी उद्धव आणि सीएमशी बोलणार : जानकर

शिक्रापूर : "बैलगाडा शर्यतींसाठी खरा लढवय्या म्हणजे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होय. त्यांना विक्रमी मताधिक्‍य द्या, मी त्यांच्यासाठी मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांना सांगून केंद्रीय मंत्रिपद आणतो.'' असे आवाहन पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी रांजणगाव-गणपती (ता. शिरूर) येथे केले.

आढळराव यांचा आज सकाळी कारेगाव (ता. शिरूर) येथून सुरू झालेला दौरा आमदार बाबूराव पाचर्णे, अरुण गिरे, भगवानराव शेळके, अनिल काशीद, पोपट शेलार व सर्व भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रांजणगाव देवस्थानमध्ये दर्शनासाठी पोचला.

जानकर म्हणाले की बैलगाडा शर्यतींवर बोलणारा पहिला खासदार पाहिला तो म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. बैलगाडा शर्यती कुणाच्या काळात बंद झाल्या आणि यातील राष्ट्रवादीचे राजकारण काय ते मीच सांगू शकतो. पर्यायाने पुढील काही महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल आणि बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा आदेश आढळरावच आणतील, हे मी पशुसंवर्धनमंत्री म्हणून सांगतो.

जातीजातींमध्ये भांडणं लावण्याच काम राष्ट्रवादीने केले आहे. आम्ही आदिवासींना आरक्षण दिलंय, शिवाय धनगर समाजाच्या आरक्षणातील कोर्टाचा निकाल पुढील तीन महिन्यांत लागेल आणि आम्ही धनगर समाजालाही आरक्षण लागू करणार आहोत. आढळरावांना मताधिक्‍य द्या; मी मुख्यमंत्री आणि ठाकरे यांना सांगून शिरूरला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळवून देतो.

या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी शिरूर-हवेलीतील राष्ट्रवादीची दुरवस्था सांगून आढळराव यांना विक्रमी मताधिक्‍य देणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी सतीश पाचंगे, सरपंच सर्जेराव खेडकर, विक्रम पाचुंदकर, राजेश लांडे, बापू शिंदे, शालिनी खेडकर व ग्रामस्थ उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com