बापटांना मी आकडेवारी समजावून सांगितली असती : अजितदादांचे असेही गणित

पुणे जिल्ह्यात गिरीश बापट यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत निधी वापरला गेला नसल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी टोमणा मारत सांगितले.
ajit pawar-girish bapat
ajit pawar-girish bapat

पुणे - जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यानुसार निधी खर्च झाला पाहिजे. मात्र गेल्या सरकारमधील पालकमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याला नियोजनापेक्षा जास्त निधी देण्याची गरज होती. मात्र किमान जास्त नाही तर आहे तो देखील खर्च होण्याची गरज होती. गेल्या वर्षीचा ९८ कोटींचा निधी खर्च झालेला नाही. बैठकीला तेव्हाचे पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित नाहीत. नाहीतर मी त्यांना आकडेवारी समजावून सांगितली असती, अशा कानपिचक्या अर्थ आणि पालकमंत्री अजित पवार यांनी बापटांना दिल्या.

मंत्री पवार यांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विविध माहिती दिली.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘‘जिल्‍ह्याच्या आर्थिक नियोजनाचे सुत्र ठरलेले आहे. यामध्ये लोकसंख्या ३० टक्के, ग्रामिण लोकसंख्या २० टक्के, क्षेत्रफळ ३० टक्के आणि मानव विकास निर्देशांक २० टक्के असे सूत्र असते. मात्र गेल्या वर्षीचा पुणे जिल्ह्याचा ९८ कोटींचा निधी खर्च झालेला नाही. जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यानुसार निधी खर्च झाला पाहिजे. मात्र गेल्या सरकारमधील पालकमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याला नियोजनापेक्षा जास्त निधी देण्याची गरज होती. मात्र किमान जास्त नाही तर आहे तो देखील खर्च होण्याची गरज होती. गेल्या वर्षीचा ९८ कोटींचा निधी खर्च झालेला नाही. बैठकीला तेव्हाचे पालकमंत्री गिरीष बापट उपस्थित नाहीत. नाहीतर मी त्यांना आकडेवारी समजावून सांगितली असती


जिल्हा नियोजन आराखड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू स्मारक आणि सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे काम रखडले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच रंकाळा, कळंबा तलावाच्या परिसर विकासाबरोबरच, इंचलकरंजी येथील शासकीय रुग्णालयाला निधी दिला जाईल. पुणे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांसाठी सेंट्रल किचनची योजना आखली जाणार आहे.‘‘

कर्नाटकातील एक पूल पाण्याच्या फुगवट्यासाठी अडसर ठरत असून, त्यामुळे दरवर्षी सांगली कोल्हापूरला पुर येत असतो. असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे असून, या तांत्रिक बाबीबाबत राज्य सरकार कर्नाटक सरकारसोबत पत्रव्यवहार करुन कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला दरवर्षी भेडसावणाऱ्या पुरस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल. तसेच विभागातील सर्व जिल्ह्यांच्या २०२०-२१ वर्षासाठीच्या नियोजन आराखड्यात जास्तीत जास्त निधी देण्याचा अर्थमंत्री म्हणुन प्रयत्न राहील, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.२७) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सांगलीच्या पुरपरिस्थितीमध्ये दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेची मदत घ्यावी लागते. यासाठी स्थानिक पातळीवर अत्याधुनिक बोटी खरेदी केल्या जाणार असून, त्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कास तलावाची उंची वाढविण्यासाठी देखील निधी दिला जाणार आहे.‘‘

मुळशी धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरणार
भविष्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे झपाट्याने वाढत आहेत. या वाढत्या नागरिकरणासाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वंतत्र धरण बांधणे शक्य नाही. त्यामुळे मुळशी धरणाचे पाणी केवळ विज निर्मितीसाठी वापरले जात आहे. हि विज निर्मिती केवळ अत्यावश्‍यक परिस्थिती मध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्याचा विचार आहे. तसेच विजेची गरज आणि मागणी भागविण्यासाठी अपारंपारिक उर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याची देखील गरज आहे.त्या दृष्टीने सरकार काम करत आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com