`आरोग्याची काळजी मलाही, पण सभेत विषय न मांडू देणे चुकीचे`

devyani dongaokar
devyani dongaokar

औरंगाबादः राज्यात व देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वचजण काळजी घेत आहेत, आजच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच मी याचा उल्लेख केला होता. सरकारने गर्दी टाळण्याचे आदेश दिले असतांना आठवड्यात दोन सभा बोलावून लोकांचा जीव धोक्यात घालण्याची आवश्यकता नव्हती.

सभा बोलवलीच तर मग विषय मांडू देऊन त्यावर बोलू दिले पाहिजे होते. पण सभागृहात मला हेतुपुरस्पर बोलू दिले नाही असा आरोप करतांनाच सगळ्याच्या आरोग्याची मला देखील काळजी असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. देवयानी डोणगांवकर यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत देवयानी डोणगांवकर अनेक मुद्दे उपस्थित करत प्रशानाकडून उत्तरे मागितली. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा लवकर संपवायची असे सांगत आपल्याला विषय वाचू दिले नाही, मागच्या सभेतील प्रोसिडिंगवर पुढे काय कारवाई झाली, कुणाला जबाबदार धरले यांची कुठलीही माहिती किंवा उत्तर देण्यात आले नाही यावर माझा आक्षेप होता. 

मार्चची सर्वसाधारण सभा ही बजेटसाठीच असते हे सर्वश्रुत आहे, मग कोरोनाचा धोका असतांना आठवडाभरात दोन सभा का बोलावल्या? हा देखील प्रश्न आहे. ३० जानेवारी रोजी शासनाचे आदेश आले होते, त्यानूसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत औषधी वगळता कुठलीही खरेदी करू नये असे नमूद करण्यात आले होते. तरीही इतर खरेदी सुरू आहे, मंजुरी काही सेंकदात दिली जात आहे. 

पण माझ्यावेळच्या प्रोसेडिंगमधील विषय मंजुर करायचा तर मला माझे म्हणणे देखील मांडू दिले नाही. मी तत्कालीन अध्यक्ष असतांना जीबीमध्ये प्रोसेडिंगमध्ये जे लिहून ठेवले होते, त्यानूसार दायित्वसाठी पैसे ठेवले नाही आणि इतर कामांसाठी चुकीचे पैसे दिले त्यामुळे प्रश्न निर्माण झाले. तेव्हा संबंधितावर जबाबदारी निश्चित करा किंवा खुलासा करावा एवढेच माझे म्हणणे होते. 

मागच्या चुका दुरुस्त करा हेच मला म्हणायचे होते, ते समोर आणण्याचा माझा प्रयत्न होता असेही डोणगांवकर यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे म्हणाल, तर मी न्यायालयात लढा देत आहे, मला न्याय मिळेलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com