i will remain next mla : Gore | Sarkarnama

पुन्हा मीच आमदार होणार : सुरेश गोरे यांचा दावा

हरिदास कड
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

चाकण : "खेड तालुक्‍यात मी आमदार झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. माजी आमदारांच्या दहा वर्षाच्या काळातील प्रलंबित कामे मी केली आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील जनता माझ्या पाठीमागे आहे. पुन्हा मीच आमदार होणार आहे. मोठ्या मताधिक्‍क्‍याने मला जनता विजयी करणार आहे,'' असा दावा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांनी केला.

रासे (ता. खेड) येथे महायुतीचे उमेदवार गोरे यांच्या प्रचारार्थ गावातील मंदिरात सभा घेण्यात आली. त्यावेळी गोरे बोलत होते. ते म्हणाले, ""रासे गावचा विकास होण्यासाठी मी निधी दिला आहे. या पुढील काळात रासे गावचा विकास होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी आमदार झाल्यानंतर तालुक्‍यातील प्रत्येक गाव माझे आहे, हे पाहून विकासकामासाठी निधी दिला आहे. कचरा डेपो रासे गावच्या हद्दीत कदापी होणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी संपादित झाल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील शिक्के काढणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केला आहे.''

या वेळी किरण मांजरे, अशोक खांडेभराड, सूर्यकांत मुंगसे, संतोष डोळस, रमेश शिंदे, प्रवीण मुंगसे, अनिकेत केदारी यांनी, आमदार गोरे यांनी गेल्या पाच वर्षात विकासकामे केली. त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देणार आहे, असे सांगितले.

या वेळी रासे येथील उपस्थितांनी आमदार गोरे यांना गावातून मताधिक्‍य देणार असल्याचे सांगितले.
या वेळी शिवाजी वर्पे, रामदास धनवटे, प्रकाश वाडेकर, ज्योती अरगडे, चंदन मुऱ्हे, किरण गवारे, सागर मुऱ्हे आदी उपस्थित होते. लक्ष्मीकांत मुंगसे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रवीण मुंगसे यांनी त्यांच्या भाषणात, खेड तालुक्‍यातील शिवसेनेच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांचे हे गाव असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला गावातून अधिक मतदान होईल, असे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख