कितीही चौकश्या केल्या तरी थोबाड बंद ठेवणार नाही : राज ठाकरे

कितीही चौकश्या केल्या तरी थोबाड बंद ठेवणार नाही : राज ठाकरे

मुंबई : 'कितीही चौकशी केल्या तरी थोबाड बंद ठेवणार नाही ' अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी ईडी चौकशी नंतर भाजपला इशारा दिला आहे. ईडी कार्यालयात तब्बल साडे आठ तास चौकशीला सामोरं गेल्यानंतर ते आपल्या कृष्णकुंज या घरी परतले.त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडे आठ तास कसून चौकशी केली. सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली राज यांची चौकशी 8:15 वाजता संपली. यानंतर राज आपल्या वाहनाने कृष्णाकुंजवर परतले. यावेळी कृष्णकुंजच्या बाहेर मनसैनिकांनी मोठी गर्दी केली. राज ठाकरे गाडीतून उतरताच मनसैनिकांनी एकच जल्लोष केला.अनेक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला.

राज यांनीही काही वेळ थांबून चेहऱ्यावर स्मितहास्य आणत कार्यकर्त्यांना धीर दिला.प्रसारमाध्यमांनी राज यांना ईडी चौकशी बाबत विचारलं असता 'मी त्यांना सांगून आलोय, तुम्हाला काय विचारायचे ते विचारा. कितीही चौकश्या केल्या तरी थोबाड बंद ठेवणार नाही,' अशी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात 'लाव रे तो व्हिडिओ' च्या माध्यमातून भाजपवर टीकेची झोड उठवली होती.यानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडलं असून त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी-गाठी घेतल्या.विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या निवडणूकित देखील राज ठाकरे भाजपला लक्ष करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी ईडीचा वापर भाजप करत आहे असा आरोप मनसे कार्यकर्ते करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com