राजकीय संन्यास घेण्याची माझी घोषणा हा राजकीय जुमला : नाना पटोले 

राजकीय संन्यास घेण्याची माझी घोषणा हा राजकीय जुमला : नाना पटोले 

नागपूर ः पराभूत झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची आपली घोषणा राजकीय जुमला होता. आपण संन्यास घेणार नसून विरोधीपक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना सतत जाब विचारत राहणार असल्याचे माजी खासदार तसेच नागपूरचे कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी सांगितले. 

नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात व राज्याच सत्तेत आल्यास विदर्भाचे राज्य करू अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले, असाही उलट सवाल पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी एका वाहिनीवर झालेल्या चर्चेत पटोले यांनी संन्यासाची घोषणा केली होती. यावर ते म्हणाले, काही गोष्टी आपल्याला महाजन यांच्याकडून वदवून घ्यायच्या होत्या. म्हणून आपण तसे बोललो. महाराष्ट्र होरपळत असताना जलसंपदा मंत्र्याला स्वतःच्या जिल्ह्यातील टंचाईची माहिती नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, अतुल लोंढे उपस्थित होते. 

पाच राज्यांममध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. तेव्हा कुठल्या भाजपच्या नेत्यांनी राजीनामा दिला होता. 
उलट राहूल गांधी यांनी पराभव मान्य केला. तातडीने राजीनामा दिला. कॉंग्रेस पक्षात लोकशाही आहे. भाजपला ती मान्य नसल्याने त्यांच्या पक्षात राजीनामा देण्याची पद्धत नाही.

नरेंद्र मोदी यांनी संविधानाला अभिवादन करून आपल्यामुळेच सर्व खासदार निवडून आल्याचे जाहीर केले. हीच संविधान विरोधी भूमिका आहे. संविधानात निवडून आलेले खासदार आपला नेता निवडतात. भाजपात उलट आहे, असे ते म्हणाले. 

जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे गुन्हे दाखल केल्या जातील तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

त्यांची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. मतमोजणीच्यावेळी प्रतिनिधी व अधिकाऱ्यांना 70 सी फॉर्म त्यांनी दिला नाही. त्यामुळे ईव्हीएमचा क्रमांक व प्रत्यक्ष मोजणी होत असलेल्या ईव्हीच्या क्रमांकात तफावत होती. 

त्यावर आम्ही आक्षेप घेतला होता. व्हीव्हीपॅटच्या मोजणीच्या वेळेही आमच्या प्रतिनिधींना उपस्थित राहू दिले नाही. जाब विचारल्यास त्यांनी दादागिरी केली, असल्याचा आरोप यावेळी पटोलेंनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com