मंत्री झालो तरी शेतकऱ्यांना विसरणार नाही : आमदार बच्चू कडू 

`मी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे आणि मंत्री जरी झालो तरी शेतकऱ्याना विसरणार नाही. शेतकऱ्यानं दोन लाखांपर्यंत कर्जमाफी या सरकारने दिली. ती दहा लाखांपर्यंत होऊ शकते. एकवेळ आमदार, अधिकाऱ्यांचा एक महिन्याचा पगार देऊ नका, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात काहीही कसर ठेऊ नका,'' असे परखड मत आमदार बच्चू कडू यांनी मांडले.
मंत्री झालो तरी शेतकऱ्यांना विसरणार नाही : आमदार बच्चू कडू 

सेवाग्राम (जि. वर्धा) : ``मी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे आणि मंत्री जरी झालो तरी शेतकऱ्याना विसरणार नाही. शेतकऱ्यानं दोन लाखांपर्यंत कर्जमाफी या सरकारने दिली. ती दहा लाखांपर्यंत होऊ शकते. एकवेळ आमदार, अधिकाऱ्यांचा एक महिन्याचा पगार देऊ नका, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात काहीही कसर ठेऊ नका,'' असे परखड मत आमदार बच्चू कडू यांनी मांडले. 

हमदापुर येथे कल सायंकाळी आयोजित शेतकरी परिषदेमध्ये ते बोलले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या हमदापुर शाखेच्या वतीने हे आयोजन केले होते.

यावेळी प्रहारचे विदर्भ प्रमुख गंजू कुबडे, जिल्हा प्रमुख जयंत तिजारे, जिल्हाध्यक्ष विकास दांदडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. जात-पात-धर्म बाजूला सारून आपण शेतकरी आहे. ही  भावना निर्माण होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्याचे सुखाचे दिवस येणार नाहीत, असे ते म्हणाले. यावेळी कडू यांनी आपल्या खास शैलीत भाजपचा समाचार घेतला.

कर्मचाऱ्यांना सातवे आयोग देण्यास किती वेळ लागला, मात्र शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग पाच वर्ष सत्तेत राहून लागू झाला नाही. कधी न दिसणारे चेहरे फक्त निवडणूक आली कि दिसतात. कधीही शेतकरी कास्तकारी वर्गाचा प्रश्नासाठी बोलत नाही आणि हेच लोक आपण निवडून देतो. त्यामुळे 70 वर्षात आपणाला मतदानाचा खरा अधिकार माहित झाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आपला बाप शेतकरी एका एकरात उत्पन्न घेण्यासाठी 13 किलोमीटर धावतो, तेव्हा त्याच्या हातात पीक दिसते. तर दुसरीकडे तरुण मंडळी सचिन तेंडुलकरच्या धावा मोजतात. आपल्या बापाच्या धावा मोजा असे तरुणांना आवाहन त्यांनी केले.

बाप मेला तरी चालतो. नेता जिवंत असला पाहिजे, अशी भावना तुमच्या मनात घर करून असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजपकडून जाती धर्माचे विषय निर्माण करून आपली डोकी भडकविण्याचे काम करीत केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com