i will not fight mla election prithviraj deshmukha | Sarkarnama

यापुढे विधानसभा लढणार नाही : पृथ्वीराज देशमुख 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुणे : सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी "यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही."अशी घोषणा केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कडेगाव तालुक्‍यातील तोंडोली गावात त्यांनी ही घोषणा केली. 

या घोषणेसोबत देशमुख यांनी "आपले चुलत भाऊ संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचेही सांगितले. 
1995सालच्या विधानसभापतंगराव कदम यांचा संपतराव देशमुख यांनी पराभव केला.संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी कदम यांचा पराभव केला,त्यानंतर1999,2009,2014 च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांचा पतंगराव कदम यांनी पराभव केला. 

संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी त्यांनाच मिळेल अशी शक्‍यता व्यक्त होत असतानाच पृथ्वीराज देशमुख यांनी 'त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याचे जाहीर करत विधानसभा न लढवण्याचा निर्णय घेतल्याने संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी भाजपकडून निश्‍चित मानली जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख