i will not accept mlas resign haribhau bagade | Sarkarnama

हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामे स्वीकारणार नाही ः बागडे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई ः राज्यात उसळलेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलनाची राजकीय झळ बसू नये म्हणून मराठा समाजाच्या आमदारांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. सर्वपक्षीय मराठा आमदारांनी राजीनामे देण्याचे सत्र सुरू ठेवले असले, तरी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हिवाळी अधिवेशनापर्यंत हे राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. 

आतापर्यंत भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांच्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत. समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलने करण्यात आली आहेत. या आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट लागले. 

राज्यभर याचे पडसाद पडले. यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या असताना त्याचा आगामी निवडणुकीत राजकीय फटका बसू नये म्हणून सर्व पक्षांतील मराठा आमदारांनी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर राजीनामे बागडे यांच्याकडे सादर केले आहेत. बागडे यांनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. 

राजीनामा दिलेले आमदार व पक्ष 

हर्षवर्धन जाधव - शिवसेना 
भारत भालके - कॉंग्रेस 
भाऊसाहेब चिकटगावकर - राष्ट्रवादी कॉंग्रेस 
दत्तात्रेय भरणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस 
सीमा हिरे - भाजप 
दौलत अहिरे -भाजप 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख