कोरेगावमध्ये यंदा हॅटट्रीक करणार : शशिकांत शिंदे

 कोरेगावमध्ये यंदा हॅटट्रीक करणार : शशिकांत शिंदे

खटाव (जि. सातारा) : ``गेल्या दहा वर्षांत या भागात लोकांची कोट्यवधींची कामे केल्याने लोकांचे माझ्यावर आतोनात प्रेम आहे. त्यामुळे याही वेळी सलग तिसऱ्यांदा कोरेगाव-खटावचा आमदार बनून एक नवा उच्चांक करणार आहे, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 

जांब (ता. खटाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

शशिकांत शिंदे म्हणाले, "सामान्य कार्यकर्ते व जनतेमुळेच एका सामान्य माथाडी कामगार कुटुंबातील व्यक्ती आमदार होऊन पुढे मंत्री बनला. येत्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा मताधिक्‍याने निवडून येण्याचा निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच विश्वास निर्माण झाला आहे.``

``विरोधक माझ्या विकासकामांवर शंका घेतात. एमआयडीसी व जिहे-कठापूरसंबंधी काहीच प्रयत्न केला नसल्याची टीका करीत आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे, तुमचा पक्ष सत्तेत आहे. मग तुम्ही का गप्प आहात ? जिहे-कठापूरचे पाणी ऑगस्टपर्यंत येणार असल्याची दवंडी पिटत होता. मग, का नाही आले, असा प्रश्‍न करून आज जे काही काम सुरू आहे, ते मागच्या सरकारने मंजूर केलेल्या पैशातूनच चालले आहे,'' असे त्यांनी सांगितले.

यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, पंचायत समिती उपसभापती संतोष साळुंखे, सागर साळुंखे, "राष्ट्रवादी'चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य दगडू शिंदे, राजेंद्र कचरे, जितेंद्र शिंदे, जालिंदर बिटले, प्रमोद गायकवाड, हणमंत मोरे उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com