तुम्ही आमदार द्या; मी तुम्हाला मंत्री देतो : मुख्यमंत्र्यांची दौंडमध्ये ग्वाही

rahul kul, devendra fadanvis
rahul kul, devendra fadanvis

केडगाव ः महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना २०१४ पेक्षा दुप्पट मताधिक्याने विधानसभेत पाठवा मी त्यांना मंत्री करतो. कुल यांच्या पाठिशी सरकार भक्कमपणे उभे असल्याने विकासाची काळजी तुम्ही करू नका. लोकलचा प्रश्न एक वर्षात मार्गी लावतो,  अशी ग्वाही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चौफुला ( ता. दौंड ) येथे दिले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुल यांच्या प्रचारार्थ आज चौफुला येथे सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. सभेला भाजपचे वासुदेव काळे, तानाजी दिवेकर, नामदेव ताकवणे, रासपचे दादा केसकर, रंजना कुल, प्रेमसुख कटारिया, नंदू पवार, शितल कटारिया, राजाराम तांबे, नामदेव बारवकर, आनंद थोरात, महेश भागवत, अनिल सोनवणे, राजेश पाटील, नागसेन धेंडे, सदानंद थोरात, दौलत शितोळे, गणेश आखाडे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ``धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदीवासींच्या सवलती लागू केल्या आहेत. त्यासाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मुळशीचे पाणी आल्यानंतर दौंड, बारामती, इंदापूर तालुक्याचे चित्र बदलणार आहे. बेबी कालव्याच्या अस्तरीकरण पैसे दिले आहेत. आजची गर्दी पाहून कुल यांचा विजय पक्का आहे.

 फडणवीस म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षांच्या कार्यकाळापेक्षा गेल्या पाच वर्षात महायुतीच्या सरकारने दुप्पट काम केले नसेल तर जनतेत जाऊन मते सुद्धा मागणार नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन सरकार काम करीत आहे. आघाडी सरकारने १५ वर्षात शेतक-यांना 20 हजार कोटी दिले तर आम्ही पाच वर्षात 50 हजार कोटी रूपये दिले. 

राहुल कुल म्हणाले, बारामतीच्या मोठ्या झाडाखाली दौंडचे झाड २०१४ पर्यंत वाढलेच नाही. दौंडला नेहमी सापत्नपणाची वागणूक दिली गेली. गेल्या पाच वर्षात १४४० कोटी रूपयांचा विकासनिधी आणला. दौंड तालुक्याच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. मुळशीचे पाणी, एमआयडीसी, लोकल हे प्रश्न आपण सरकारच्या माध्यमातून सोडविणार आहोत. सदानंद थोरात यांनी प्रास्ताविक केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com