i will give funds to this institute after become mp : BAPAT | Sarkarnama

खासदार झाल्यावर पहिला निधी 'या' संस्थेला देणार : गिरीश बापट

प्रणिता मारणे
बुधवार, 15 मे 2019

पुणे : "पुण्याचा जर खासदार झालो तर पहिला निधी हा नटरंग अकादमी या संस्थेला देणार," असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

नटरंग अकादमीतर्फे अभिनेता प्रसाद ओक याला नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार गिरीश बापट यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी बापट बोलत होते.

ते म्हणाले, "चांगले काम करणाऱ्याच्या सतत पाठिशी उभे रहावे यासाठी मी या व्यासपीठावर आलो आहे. धडपड करणाऱ्या कलाकारांच्या पाठिमागे नटरंग संस्था उभी असते. त्यामुळे मी खासदार झाल्यावर पहिल्या खासदार निधीतील एक लाख रूपये डिपॉझिट म्हणून नटरंग संस्थेला देईल."

पुरस्काराला उत्तर देताना प्रसाद ओक म्हणाला, "इतर अनेक पुरस्कार आहेत. परंतु त्यामध्ये राजकारण असते. फक्त प्रेम आणि माया या नटरंग पुरस्कारात आहे. पुणे माझी जन्मभूमी आहे म्हणून माझ्या आईने सन्मान केला ही भावना आहे. तसेच मातृतुल्य व्यक्तींसमोर पुरस्कार म्हणून भरून आले आहे. शेवटी गुणवत्ता म्हणजे पुणे यामध्ये काही वादच नाही."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख