मुक्ताईनगरला खडसेंनाही टक्कर देणार, उल्हास पाटील 

मुक्ताईनगरला खडसेंनाही टक्कर देणार, उल्हास पाटील 

नाशिक ः खान्देशातील कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर झाली पाहिजे. पण त्यापेक्षाही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी खरी लढाई ईव्हीएम यंत्राशी आहे. ते हटविले जावे. जळगावमध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा मजबुत असल्याने विधानसभेच्या सात जागा हव्यात. एकनाथ खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये चांगली टक्कर देऊ असा विश्वास कॉंग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

असाच सूर जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यानी आळविला. 

कॉग्रेसची विभागीय बैठक झाली प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नाशिकला झाली. या बैठकीत खान्देशच्या तिन्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी ईव्हीएम यंत्रावर संशय घेत संघटनात्मक बांधणीइतकेच ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूका घेणे गरजेचा असल्याच्या तक्रारी नोंदविल्या.

जळगाव जिल्ह्यातील माजी खासदार उल्हास पाटील यांनी कॉग्रेस पक्षाची जिल्ह्यातील स्थिती मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पेक्षा चांगली आहे. मित्र पक्षाच्या उमेदवारांपेक्षा कॉग्रेस पक्षाला जास्त मतदान झाले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी कॉग्रेसला 7 जागांवर संधी मिळाली पाहिजे. एक जागा वाढवून मिळावी. अशी मागणी केली. 

अमळनेर, रावेर,जामनेर, जळगाव शहर यासोबत भुसावळ, चोपडा आणि मुक्ताईनगर अशा 7 जागांवर कॉग्रेस पक्षाकडून भाजप-शिवसेना युतीला टक्कर देण्याची ताकद आहे. वंचित आघाडीसह धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न प्रदेश स्तरावरुन व्हावा. जळगावला वंचित आघाडीला एखादी जागा सोडावी लागली तरी चालेल. 

शिंदखेड्याची मागणी 
धुळे जिल्ह्याच्या बैठकीत जिल्ह्यात कॉग्रेसचा तीन जागांवर प्रभाव आहे शिंदखेड्याची जागा कॉग्रेसने घेण्याची मागणी झाली. कॉग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकारीणीत नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी.तसेच मतपत्रिकेवर निवडणूका घेण्यासाठी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केला जावा. स्थानीक व जिल्हा स्तरावरील निवडणूकात कॉग्रेस जागा जिंकते मग मोठ्या निवडणूकीत ही मत जाता कुठे ? हे संशयास्पद आहे. 

त्यामुळे खरी लढाई ईव्हीएम यंत्रातील घोटाळ्याशी आहे. असा आरोप अनिल भामरे यांनी केला. याशिवाय निष्ठांवताना विधानसभेसाठी संधी द्यावी. कार्यकर्त्यांची मरगळ हटविण्यासाठी तरुणांना संधी द्यावी. अशी मागणी झाली. नंदुरबारला थोड्या आधिक फरकाने असाच सूर राहिला. ईव्हीएम यंत्रावर निवडणूका नकोत, तरुणांना व निष्ठावंताना संधी द्यावी. अशी मागणी करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com