I will disclose my talks with Rahul Gandhi : Jyotiraditya Sindia | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
बारामती : बारामतीत अजित पवार आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

राहुल गांधी आणि माझ्यात काय बोलणे झाले हे मी सांगणार नाही  : ज्योतिरादित्य शिंदे 

सरकारनामा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पक्षाने मला काय द्यायला पाहिजे यापेक्षा मी पक्षासाठी काय योगदान देतो हे महत्वाचे आहे असे मी मानतो .

-ज्योतिरादित्य शिंदे

दिल्ली : " माझ्या वडिलांप्रमाणेच मलाही कोणत्याही पदाची लालसा नाही. काँग्रेस पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार आहे ," असे खासदार  ज्योतिरादित्य शिंदे यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले . 

मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत होते . मात्र ऐनवेळी काँग्रेस पक्षाने कमलनाथ यांच्या अनुभवाला महत्व देत त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली .

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना उप मुख्यमंत्री पदाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली . तुम्हालाही पक्षाकडून  उप मुख्यमंत्री पदाची ऑफर होती का ? अशी विचारणा झाल्यावर ज्योतिरादित्य शिंदे म्हणले, " राहुल गांधी आणि माझ्यात काय बोलणे झाले हे सांगणार नाही . पण मी आधीही म्हणालो होतो की पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन . पक्षाने मला दिल्लीतच   काम दिले आहे आणि मी ते चांगल्या पद्धतीने करेन . पक्षाने कमलनाथ यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मला सांगण्यात आले तेंव्हा मी  म्हणालो ओके . त्यांचे नाव ठरले असेल तर काँग्रेस आमदारांच्या बैठकीत मी कमलनाथांचे नाव सुचवतो . आणि मी तसे केले . "

राहुल गांधी , कमलनाथ आणि तुमचा एकत्र फोटो राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोतील तुमचे हास्य खरे होते की फोटोसाठी होते ? अशी विचारणा केला असता ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, " जे आपण लोकांना शिकवतो तसे आपण जीवनात वागू शकलो पाहिजे . मी त्या प्रसंगाला   चांगल्या पद्धतीने आणि हसतमुखाने सामोरे गेलो . शिवाय लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पक्षाने मला काय द्यायला पाहिजे यापेक्षा मी पक्षासाठी काय योगदान देतो हे महत्वाचे आहे असे मी मानतो . "

राहुल गांधी नेहेमी तरुणांना राजकारणात पुढे आणण्याची भाषा करतात पण त्यांनी मध्यप्रदेशात तारुण्यापेक्षा अनुभवलं महत्व देण्याची सावध भूमिका घेतली का ?  या प्रश्नावर भाष्य करताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, " युवकांनांहि अनुभव असतो आणि वयाने ज्येष्ठ असलेल्याना अनुभव असतोच असे नाही .  वय किंवा अनुभवापेक्षा क्षमता महत्वाची आहे असे मी मानतो . गेली दिड दोन वर्षे मी मध्यप्रदेशातील गावागावात गेलो. दहा हजार किलोमीटर प्रवास केला . पोटनिवडणूक असो की स्थानिक निवडणुका , मी काँग्रेसच्या विजयासाठी झटलो. पण पक्षाने मला जे दिले त्यावर  मी समाधानी आहे. पक्षाने मला दहा वर्षांपूर्वी मंत्री केले पुढे स्वत्रंत कार्यभार दिला . आज मी पक्षाचा चीफ व्हीप  आहे . "

ज्योतिरादित्य शिंदे पुढे म्हणाले ," शेतकऱ्यांवर गोळ्या घालणारे सरकार मला घालवायचे होते . भ्रष्टाचार, अत्याचार आणि शिष्टाचार यात गुंतलेले भाजप सरकार पदच्युत झाल्याशिवाय मी सत्काराचा हार स्वीकार करणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण झाल्याचे मला समाधान आहे . " 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख