माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांच्या पराभवासाठी - डॉ. आशीष देशमुख - i will degeat cm, says ashish deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांच्या पराभवासाठी - डॉ. आशीष देशमुख

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करण्यासाठीच आपण निवडणूक लढवीत आहोत. कॉंग्रेसने याच कारणासाठी आपल्याला उमेदवारी दिल्याचे कॉंग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्‍चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या खामला येथील प्रचार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करण्यासाठीच आपण निवडणूक लढवीत आहोत. कॉंग्रेसने याच कारणासाठी आपल्याला उमेदवारी दिल्याचे कॉंग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्‍चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या खामला येथील प्रचार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

देशापुढील आणि महाराष्ट्रापुढील अत्यंत आव्हानात्मक अशा स्थितीत राज्याच्या विधानसभेची ही निवडणूक होत आहे. या देशाची आर्थिक घडी विस्कटून टाकणाऱ्या, या देशातील शांतता आणि सौहार्द संपवणाऱ्या, बलात्काऱ्यांना संरक्षण देणाऱ्या, जीएसटी, नोटाबंदी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, बंद होत असलेले उद्योगधंदे, कमी होत असलेली जीडीपी, महागाई अशा अनेक विषयांना कारण ठरणारी धोरणे आखणाऱ्या आणि मस्तवालपणे मतदारांना गृहीत धरणाऱ्यांचा पराभव करण्यासाठी आपण लढा देत आहोत. ही लढाई माझी एकट्याची नसून सर्व समाजाची आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर तुमच्या-माझ्या जीवनात काय बदल झाला? असा सवाल उपस्थित करून सुजाण व सुशक्षित मतदारांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहीजे, असे देशमुख म्हणाले.

खामला येथील कॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयात शेकडो युवक-युवतींनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी बबनराव तायवाडे, प्रफुल्ल गुडधे पाटील, राकेश पन्नासे, मंगेश कापसे, अभिजित फाळके, मंगेश कामोने व इतर मान्यवर उपस्थित होते. देशमुख यांना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नागपूर जिल्हा कमिटीने एका पत्राद्वारे आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख