राजू शेट्टींना मी दणदणीत मतांनी हरविणार : रघुनाथदादा पाटील

राजू शेट्टींना मी दणदणीत मतांनी हरविणार : रघुनाथदादा पाटील

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला आहे. खासदार शेट्टी यांच्याविरोधात लढून चांगल्या मताधिक्‍याने निवडून येऊ, असा विश्‍वास पाटील यांनी आज पुण्यात केला. 

खासदार शेट्टी व रघुनाथ पाटील हे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे शिष्य. मात्र काळाच्या ओघात या संघटनेतून बाहेर पडत खासदार शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नवी संघटना स्थापन केली. कायम चळवळीत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. त्यातून राज्यात विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रात संघटना वाढवली, मजबूत केली. त्या ताकदीच्या आधारे खासदार शेट्टी एकदा आमदार व दोनदा खासदार झाले. गेल्यावेळी खासदार शेट्टी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले होते. मात्र यावेळी ते कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर राहण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर रघुनाथ पाटील यांनी खासदार शेट्टी यांच्याविरोधात उभे राहण्याची घोषणा केली आहे. 

या मतदारसंघात पाटील यांची ताकद किती हा प्रश्नच आहे. मात्र, त्यांच्या या पवित्र्याने शेतकऱ्यांच्या चळवळीला बाधा येत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. शेट्टी व पाटील यांचा विरोध हा पारंपरिक आहे. मात्र त्यांच्या या स्पर्धेमुळे शेकतरी चळवळ मात्र, अडचणीत येणार असल्याची भावना शेतकरी कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. 

दरम्यान, शेतकरी, जवान व कामगारांची आघाडी करून राज्यातील लोकसभेच्या 48 जागा लढविण्याचा निर्णय रघुनाथ पाटील यांनी घेतला आहे. पाटील म्हणाले, " गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने देऊन सत्ता मिळवली. आता या सत्तेला पाच वर्षाचा काळ होत आला. तरी देखील कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्य नागरिकासह शेतकऱ्याचे जगणे मुश्लिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभेच्या जागी आम्ही निवडणूक लढविणार आहोत. त्यामध्ये सर्व घटकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार असून भाजप युती आणि कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक संघटना सोबत चर्चा सुरू आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com