i will br pune`s mp : Kakade | Sarkarnama

पुण्याचा खासदार मीच होणार; ते देखील तीन लाखांच्या मताधिक्याने : संजय काकडेंचा दावा

उमेश घोंगडे
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण उभे राहणार, कोणाची किती ताकद आणि कोण कोणाला पाडणार, याची पुण्यातील जागरूक नागरिकांत चर्चा सुरू असतानाच सर्व इच्छुक उमेदवार आज नाष्ट्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी आपली स्ट्रॅटेजी उघड केली. यात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सिक्सर मारत भाजपचे तिकिट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण उभे राहणार, कोणाची किती ताकद आणि कोण कोणाला पाडणार, याची पुण्यातील जागरूक नागरिकांत चर्चा सुरू असतानाच सर्व इच्छुक उमेदवार आज नाष्ट्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी आपली स्ट्रॅटेजी उघड केली. यात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सिक्सर मारत भाजपचे तिकिट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.

या चर्चेला निमित्त होते वाडेश्वर कट्ट्याचे. या कट्ट्यावर संजय काकडे, काॅंग्रेसकडून मोहन जोशी, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, मनसेचे नेते बाबू वागस्कर उपस्थित होते. विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि भाजपकडील तिसरे इच्छुक पालकमंत्री गिरीश बापट हे व्यस्ततेमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. ते नसल्याने काकडे यांच्या दाव्याला जागेवरच उत्तर मिळू शकले नाही.

"मी भाजपकडून इच्छूक आहे. माझे मेरिट पाहता माझ्याशिवाय निवडून येणारा भाजपमध्ये कोणी आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे तिकीट मलाच मिळणार," असे संजय काकडेंनी सांगितले. "मी काही सर्व्हे केला नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी तो केला आहे. त्यानुसार 72 टक्के पुणेकरांनी मला पसंती दिली आहे. उरलेल्या 28 टक्क्यांमध्ये इतर सर्व शिरोळे, बापट आदी उमेदवार आहेत," असेही त्यांनी सांगितल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. तिकीट कोणाचेही घेऊन मी लढलो तरी तीन लाख मतांनी मी निवडून येणार. 2019 मध्ये पुण्याचा खासदार मीच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मी भाजपचा सहयोगी सदस्य असल्याने मला कालच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. त्यात नाराज होण्याचा मुद्दा नाही. निमंत्रण असते तर मी नक्की गेलो असतो, असे त्यांनी सांगितले. शरद पवारांची भेट घेतली हे खरे आहे. पण त्यात राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काॅंग्रेसकडून उभा राहणार असल्याची अफवा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

संजय काकडे यांच्या या बॅटिंगनंतर राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी त्यांना चिमटा काढला. `निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर संजय काकडे दोन तिकिटांवर निवडणूक लढवू शकतात, असा टोला त्यांनी लगावला. "उमेदवारी ठरवण्याची एक व्यवस्था भाजपकडे आहे. इच्छा कोणीही व्यक्त करू शकते. पक्ष ठरवेल त्यालाच उमेदवारी मिळेल," असे भाजप नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी सांगितले.

मोहन जोशी यांनी सांगितले की काँग्रेसमध्ये नेहमी निष्ठावंतांना संधी मिळते. त्यामुळे आता इच्छुकांची गर्दी वाढली असली तरी त्याची चिंता आम्हाला नाही. पुण्यात भाजपचा खासदार दुसऱ्यांदा निवडून येत नाही हा इतिहास आहे. अण्णा जोशी दुसऱ्यांदा उभे राहिले आणि पडले. प्रदीप रावत 99 ला निवडून आले 2004 ला पडले. अनिल शिरोळे देखील 2014 मध्ये निवडून आले 2019 मध्ये त्यांचा पराभव होईल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख