I Will Be Proved Innocent Say Chagan Bhujbal to Sanjay Raut | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

संजय राऊत मी निष्कलंक आहे. तेव्हाही अन्‌ आजही : छगन भुजबळांनी सुनावले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 एप्रिल 2019

''माझ्यावरील कारवाई सुडभावनेने होती. त्याचा पुरावा म्हणजे स्वतः संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहे. मग जर तेव्हा मी निष्कलंक होतो तर आज संजय राऊतांना वेगळा साक्षात्कार कसा झाला?, मी तेव्हाही निष्कलंक होतो. आजही आहे," असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देतांना सांगीतले.

नाशिक : ''माझ्यावरील कारवाई सुडभावनेने होती. त्याचा पुरावा म्हणजे स्वतः संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहे. मग जर तेव्हा मी निष्कलंक होतो तर आज संजय राऊतांना वेगळा साक्षात्कार कसा झाला?, मी तेव्हाही निष्कलंक होतो. आजही आहे," असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देतांना सांगीतले.

शिवसेनेचे राऊत यांनी येथे झालेल्या जाहीर सभेत खटला सुरु असलेले समीर भुजबळ तुम्हाला खासदार म्हणुन चालतील का? त्यांना मतदान करु नये असे आवाहन केले होते. त्याबाबत भुजबळ यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, ''साध्वी प्रज्ञानसिंह ही मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहे. तिला एटीएस पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी पकडले होते. त्यांच्या तपासातुन तिच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल झाला होता. तिने केलेल्या कटात शेकडो लोक जखमी झाले होते. सात- आठ नागरीक मृत्युमुखी पडले होते. तिला भाजपने उमेदवारी दिली आहे. ती उमेदवारी शंजय राऊत यांना चालते काय? त्यावर त्यांची काय भूमिका आहे?"

भुजबळ पुढे म्हणाले, "मी आणि समीर भुजबळ यांच्यावर सरकारने सुडबुध्दीने कारवाई केली होती हे जगजाहीर आहे. मला अडकवण्यात आल्यावर स्वतः राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. ते पत्र आजही रेकॉर्डवर आहे. त्यामुळे माझ्याविरोधातील कारवाई योग्य नाही. ती न्यायालयात टिकणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हा शिवसेनेचे बळ भुजबळांमागे अशा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. मी जर तेव्हा निष्कलंक होतो तर आजही निष्कलंकच आहे. भविष्यातही निष्कलंकच सिद्ध होईन."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख