i will also seat on six floor nera cm cabine | Sarkarnama

कात्रित पकडल्यावर काम बरोबर होईल : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

मुंबई : "" मी सहाव्या मजल्यावरच जिथे पूर्वी सीताराम कुंटे बसायचे त्या दालनात उपमुख्यंमत्री म्हणून बसणार आहे,'' असे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. 

मुंबई : "" मी सहाव्या मजल्यावरच जिथे पूर्वी सीताराम कुंटे बसायचे त्या दालनात उपमुख्यंमत्री म्हणून बसणार आहे,'' असे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. 

खाते वाटप आणि अन्य विषयावर विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना अजित पवार म्हणाले, की मी सहाव्या मजल्यावरच बसायचे ठरवले आहे म्हणजे सहाव्या मजल्यावरच एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे आणि दुसऱ्या बाजूला माझे दालन असेल आणि आम्हा दोघांच्यामध्ये मुख्यसचिवांचे कार्यालय राहील. म्हणजे कसे दोन्ही बाजूंनी दोघे असणार. कात्रीत कपडल्यावर काम बरोबर होईल. 

कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात दिल्लीहून परतले की सर्व वरिष्ठ बसून खाते वाटप अंतिम करतील. सर्व मंत्र्यांना कामकाज चालविण्यासाठी दालनांचे वाटप करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय सर्व मंत्र्यांना निवासासाठी बंगल्याचे वाटपही सुरू आहे.

यापूर्वीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नव्हते त्यामुळे पाच वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून माझे जे कार्यालय होते त्यात फेरबदल झाले. कार्यालयाच्या जागेचे विभाजन करून काही कक्ष उमे राहिले त्यामुळे मी नवीन जागेच्या शोधात होतो.पण, मी सहाव्या मजल्यावरच बसेन. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख