i was surprised by Bhaiyu maharaj`s great vision : Shirole | Sarkarnama

भय्यू महाराजांच्या दिव्यदृष्टीने मी अवाक झालो होतो : शिरोळे

उमेश घोंगडे
मंगळवार, 12 जून 2018

पुणे : ``भय्यू महाराजांची माझी पहिली भेट १९९९ मध्ये झाली. या पहिल्या भेटीत माझ्या लहान भावाच्या 1991 साली झालेल्या अपघाती निधनाबद्दल बिनचूक सविस्तर माहिती दिली. भावाच्या निधनाची वेळ, अपघाताचे ठिकाण असा सारा तपशील त्यांनी तंतोतंत सांगितला. अंधश्रद्धेला मी कायमच विरोध केलेला आहे. मात्र भय्यूजी महाराजांच्या या दिव्यदृष्टीने मी अवाक झालो,``अशी भावना पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली.

शिरोळे हे भय्यू महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांची पहिली ओळख अमरावतीला 1999 मध्ये झाली.  तितकाच त्यांच्यात स्नेहदेखील होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत महाराजांचा सल्ला नेहमीच उपयोगी पडल्याचे त्यांनी सांगितले. भय्यू महाराजांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.  आज त्यांच्या निधनाने बसलेला धक्का शब्दात सांगता येणार नाही,`` अशी भावना शिरोळे यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, "" पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह राज्यातील आणि देशातील सर्वपक्षीय अनेक नेत्यांचे त्यांच्याशी गुरू-शिष्याचे आणि त्याचबरोचर स्नेहाचे नाते होते. प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात धावून जात योगतय ती मदत करणे हे महाराजांचे विशेष होते. राज्यातील सामाजिक सोहार्द कायम राहावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. कोपर्डीच्या घटनेनंतर त्यांनी घेतलेली भूमिका दोन्ही समाजाला समाजावून सांगणारी तसेच एकोप्याची भावना निर्माण करणारी होती.``

``त्यांच्या सपंर्कात आलेल्या काही लोकांच्या वागण्यावरून ते नाराज झाल्याचे मी पाहिले आहे. लोक असे का वागतात, अशी मला विचारणा करून अनेकवेळा त्यांनी याबाबत माझ्याकडे खंत व्यक्त केली होती. स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्याशीदेखील त्यांचा विशेष स्नेह होता. भय्यू महाराज हे प्रचंड अध्यात्मिक शक्ती असलेले असामान्य व्यक्तीमत्व होते. त्यांच्या जाण्याने व्यक्तीश: मला इतका धक्का बसला आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख