I was never involved in ruccus in assembly or parliament- Pawar | Sarkarnama

'सभागृहात सीट कधी सोडली नाही : पवार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - सत्ताधारी पक्षाने संसदीय कार्यपद्धती आणि तत्वे जतन करण्याची आज गरज आहे. संसदेचे कामकाज सुरळीत कसे चालेल, ही जबाबदारी जपणे अधिक आवश्यक आहे. विरोधक विविध विषयांवर आपला विरोधी स्वर लावत असले, तरीही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी त्यांनी विसरून चालायची नाही. आज माझ्या पन्नास वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही कुठल्या गोंधळात सहभागी झालो नाही.
सभागृहात मी माझी सीट कधीही सुटू दिली नाही !..." अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सध्याच्या काळातील संसदीय कार्यपद्धतीवर भाष्य केले.

पुणे - सत्ताधारी पक्षाने संसदीय कार्यपद्धती आणि तत्वे जतन करण्याची आज गरज आहे. संसदेचे कामकाज सुरळीत कसे चालेल, ही जबाबदारी जपणे अधिक आवश्यक आहे. विरोधक विविध विषयांवर आपला विरोधी स्वर लावत असले, तरीही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी त्यांनी विसरून चालायची नाही. आज माझ्या पन्नास वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही कुठल्या गोंधळात सहभागी झालो नाही.
सभागृहात मी माझी सीट कधीही सुटू दिली नाही !..." अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सध्याच्या काळातील संसदीय कार्यपद्धतीवर भाष्य केले.

शिवाय, संसदेत गोंधळ निर्माण होऊ नये, त्यातून नागरिकांना चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. नव्या पिढीत लोकशाही कशी रुजेल, याची काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे माजी विद्यार्थी असणारे पवार आणि खासदार अमर साबळे या दोघांचा सत्कार संस्थेतर्फे शनिवारी करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे या वेळी उपस्थित होते.

आपल्या आठवणी सांगताना पवार म्हणाले, " एखादा परिसर कालपरत्वे बदलतोच, पण तिथला माणूस बदलण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. त्या-त्या परिसरातील गुणात्मक बदलांमध्ये तिथल्या शैक्षणिक संस्थांचे योगदान अतिशय मोलाचे ठरते. बारामतीसारख्या गावाच्या गुणात्मक विकासात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले. या संस्थेतील अखंड उर्मी अंगी असणाऱ्या आणि ज्ञानसाधनेत गुंतलेल्या अनेक शिक्षकांचा आमच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होता येणे ही आपल्या आयुष्यातील जमेची बाजू असली, तरी ते पद तेवढेच आव्हानांचेही असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. आपल्या कारकिर्दीत घडलेल्या भीषण भूकंपानंतर लातूर पुनःश्च उभे करणे किंवा प्रचंड मनुष्यहानी घडवणारे बॉम्बस्फोट झालेल्या मुंबईने दोनच दिवसांत आपले व्यवहार खंबीर मनाने पूर्वपदावर आणणे, हे आव्हानात्मक प्रसंगही आपल्यापुढे आले, असेही ते म्हणाले.

अशी मिळाली सैन्यात मुलींना संधी
पवार म्हणाले, "देशाच्या सैन्यात मुलींना प्रवेश माझ्या संरक्षण मंत्री असण्याच्या काळात मिळू शकला, याचा मला मनस्वी आनंद आहे. जगात अनेक मोठ्या देशांत सैन्याच्या विविध शाखांत मुलींना संधी उपलब्ध असताना आपल्याकडे मात्र ती नव्हती. त्यासाठी अनुकूल वातावरणही नव्हते. पण हा बदल घडावा, म्हणून मी मुलींच्या प्रवेशाचा निर्णय घेतला. आज जेव्हा 26 जानेवारीस दिल्ली येथे सैन्यदलाच्या संचालनाची प्रमुख एक मुलगी होते, तेव्हा एक भारतीय म्हणून माझे ऊर अभिमानाने भरून येते !

शाळेसाठी 25 लाख !
कार्यक्रमात खासदार अमर साबळे यांनी बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेसाठी आपल्या खासदार निधीतून 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या वेळी ते म्हणाले, " अलीकडच्या काळात पारंपरिक शिक्षण कालबाह्य होत चालले आहे. त्याऐवजी आज सर्वच क्षेत्रांत कौशल्याभिमुख आणि संशोधनाधारीत शिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज शिक्षणात नवनवे प्रयोग व्हायला हवे आहेत. तसेच, या सोबतीलाच मूल्यशिक्षणाची जपणूकही व्हायला हवी आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख