उद्धवजी 'जुन्या' गोष्टी विसरले असतील का ही शंका होती पण . . 

bhaskar_jadhav_udhhav_thackare
bhaskar_jadhav_udhhav_thackare

खेड  : मी शिवसेनेत येण्याचा विचार करत असताना उद्धव ठाकरे जुन्या गोष्टी विसरले असतील का? हा प्रश्न मनात होता. परंतु त्यांची भेट झाल्यानंतर मला कळले की जे माझ्या मनात होत तसं काही नाही.  मी तेव्हाच शिवसेनेत परतण्याचा निर्णय पक्का केला, असे भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या स्वागत मेळाव्यात बोलताना सांगितले . 
शहरातील पाटीदार भवन येथे शिवसेनेच्यावतीने भास्कर जाधव यांच्या स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी ते बोलत होते . भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडून जेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेंव्हा त्यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केली होती. त्या जुन्या आठवणी उद्धव ठाकरे  विसरले असतील का असा संदर्भ त्याच्या भाषणाला होता . 

भास्कर जाधव म्हणाले, चिपळूण व गुहागर पाठोपाठ खेड तालुक्‍यातील शिवसैनिक ज्या प्रकारे माझे स्वागत करत आहेत, त्यातून मी घेतलेला निर्णय शंभर टक्के बरोबर आहे हे जाणवत आहे.खरी श्रीमंती मी आज शिवसैनिकांकडून मिळत असलेल्या सन्मानातून अनुभवतो आहे. मला निवडणुकीची चिंता नाही. बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक हाच खरा कार्यकर्ता म्हणून ताठ मानेने जगू शकतो. 

अनेकांना   शिवसेनेत सामील व्हायचे आहे. परंतु तूर्तास सावध व सावकाशपणे त्यांची यादी करून शिवसेना पक्षप्रमुख यांना देणार आहे. माझ्या शिवसेना प्रवेशात आमचे नेते रामदास कदम यांनी मो;याची मदत केली . त्यांचे ऋण मी फेडू शकणार नाही. यापुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासह जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पक्षाचा भगवा सर्व ठिकाणी डौलात फडकत ठेवतील, असा विश्वास भास्कर जाधव यांनी येथे व्यक्त केला. 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांनी आज खेड दौऱ्याला सुरवात केली. लोटे, पटवर्धन लोटे, आवाशी फाटा, लवेल, दाभिळनाका, बोरज, खोपी फाटा, भरणे आदी ठिकाणी जाधव यांचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले.

या वेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख राजा बेलोसे, शहरप्रमुख निकेतन पाटणे, माजी नगरसेवक संजय मोदी, राजेश बुटाला, शंकर कांगणे, अरुण कदम, सभापती अपर्णा नक्षे, नागेश तोडकरी, बशीर हमदुले, अजिंक्‍य मोरे आदी उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com