मी थकलोय पण, राजकारणातून निवृत्त होणार नाही : देवेगौडा 

मी थकलोय पण, राजकारणातून निवृत्त होणार नाही : देवेगौडा 

बंगळुरू : मी थकलो असलो तरी राजकारणातून कधीच निवृत्त होणार नाही असे स्पष्ट करतानाच कॉंग्रेस आणि प्रादेशिक पक्षांकडे असे अनेक दिग्गज नेते आहेत की ते देशाचे नेतृत्व करू शकता. 2019 मध्येही आम्ही कॉंग्रेसच्या हातात हात घालून पूर्ण ताकदीनिशी लढू. डॉ. मनमोहनसिंग यांनीही दहावर्षे देश चालविला आहे याकडे लक्ष वेधत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय निर्माण होऊ शकतो असा विश्वास माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी व्यक्त केला आहे. 

कर्नाटकात आज माझा मुलगा कुमारस्वामी मुख्यमंत्री बनला असला तरी मी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ही ऑफर नाकारली. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कुमारस्वामी हे सरकार व्यवस्थित चालवतील असे कॉंग्रेस नेत्यांनीच स्पष्ट केल्याने मुख्यमंत्रीपद जेडीयूकडे आले अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीयूच्या विजयानंतर देवेगोैडा यांची आजतक या हिंदी वाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय आणि कर्नाटकातील राजकारणावर भाष्य केले. "" मी ही तेरा पक्षांना बरोबर घेऊन देश चालवला. मी पंतप्रधान असताना काही चुका झाल्या पण, मी कोणावरही आरोप केले नाहीत. देशातील सद्यस्थिती मात्र चिंताजनक आहे. गोरक्षकाच्या मुद्यावर हिंसाचार केला जात आहे हे दुर्दैव आहे.'' 

माझे वय झाले आहे. मी 2019मध्ये निवडणूक लढण्यास तयार नाही. मला प्रकृती कशी साथ देते यावरच लढायचे की नाही हे अवलंबून असेल. माझे वय कितीही वाढले तरी राजकारणातून कदापी निवृत्त होणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कर्नाटकाचे मुख्यमंत्रीपद रोटेशनने असणार नाही तशी कॉंग्रेसने अटही घातलेली नाही त्यामुळे कुमारस्वामी हे पुढील पाचवर्षे मुख्यमंत्री असतील. हे सरकार कसे टिकेल याची जबाबदारी माझी आहे आणि त्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेतलेला असेल असे देवेगौडा यांनी सांगितले. 

देशातील धर्मनिरपेक्ष पक्षांकडून काही चुका झाल्या आहेत. त्या सुधारण्याची संधी आहे आणि तसे झाले तर देशातील चित्र नक्कीच बदललेले दिसेल असे असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले "" कुमारस्वामींचा उद्या शपथविधि होत आहे. या समारंभाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, करूणानिधिंचे पुत्र स्टॅलिन, फारूख अब्दुल्ला, ममता बॅनर्जी यांच्यासह डाव्या आणि समाजवादी नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com