i support maratha reservation : Bhujabal | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मराठा आरक्षणाला पाठिंबाच! मात्र काहीजण माझ्याविरोधात वातावरण तयार करतात : छगन भुजबळ

अमोल कविटकर
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

पुणे : मराठा आरक्षणावरुन काही लोक माझ्या विरोधात वातावरणात तयार करत आहेत, असा आरोप ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. जी भूमिका सर्व राजकीय पक्षांची आहे, तीच माझीही भूमिका आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा फुले समता पुरस्कार शरद पवार यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी भुजबळ बोलत होते.

"ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, ही सुरवातीपासूनची भूमिका आहे. मात्र या विषयावरून माझ्यावर नाहक आरोप केले जात आहेत. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार योग्य पावले टाकताना दिसत आहे.'' असे सांगून विषयावरून भुजबळ यांनी राज्य सरकारला एकप्रकारे प्रमाणपत्रच दिले. मात्र, एसईबीसी व ओबीसी हे वेगळे नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने शब्दात अडकवू नये, त्यामुळे मूळचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमची कोणतीच हरकत नाही, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख