I should become cm, is not my desire but party workers expectations | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
बारामती : बारामतीत अजित पवार आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

मी मुख्यमंत्री व्हावे, ही माझी नव्हे; तर कार्यकर्त्यांची इच्छा

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : "मी मुख्यमंत्री व्हावे, ही माझी नव्हे; तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, त्या कार्यकर्त्यांना आपण ओळखत नाही. शिवाय आपण तसा दावाही केला नाही,'' असे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. आपली ही तिसरी टर्म असल्याने भाजपची प्रथा-परंपरा आपल्याला अवगत असल्याने असे करून काही होत नसते, अशी प्रतिक्रिया त्यांनी गुरुवारी येथे व्यक्‍त केली.

औरंगाबाद : "मी मुख्यमंत्री व्हावे, ही माझी नव्हे; तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, त्या कार्यकर्त्यांना आपण ओळखत नाही. शिवाय आपण तसा दावाही केला नाही,'' असे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. आपली ही तिसरी टर्म असल्याने भाजपची प्रथा-परंपरा आपल्याला अवगत असल्याने असे करून काही होत नसते, अशी प्रतिक्रिया त्यांनी गुरुवारी येथे व्यक्‍त केली.

पत्रकार परिषदेत मुंडे यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची यादीच समोर ठेवली. त्यानंतर पत्रकारांनी आपण मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी होत आहे? या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ""भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पक्षनेतृत्वासमोर काही कार्यकर्त्यांनी तशा भावना व्यक्‍त केल्या. मात्र, आपण त्या कार्यकर्त्यांना ओळखत नाही. यापूर्वी आपण मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलल्याचा आरोप केला गेला. खरे तर मंत्री विनोद तावडे यांनी तसे काहीतरी वक्‍तव्य केले होते. पण, आपण ते वक्‍तव्य कधीच स्वीकारले नाही,'' असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलल्यामुळेच एकनाथ खडसे यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण केल्या. आता राज्यातील महत्त्वाचा ओबीसी चेहरा म्हणून तुम्ही पुढे येत आहात. त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, असा प्रश्‍न विचारला असता, ""ते आपल्याला काही माहीत नाही,'' असे उत्तर त्यांनी दिले.

परळीमध्ये चांगली फाइट होईल
"परळीमध्ये काय सुरू आहे?' असा प्रश्‍न मंत्री पंकजा मुंडे यांना विचारला असता, ""परळीत बहिणीचीच हवा आहे,'' असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर "निवडणूक एकतर्फी होईल का?' असा प्रश्‍न उपस्थित केला असता, ""चांगली फाइट होईल,'' असे त्यांनी बोलून दाखविले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख