I represent traders - MLA Raj Purohit in State Assembly | Sarkarnama

मी व्यापाऱ्यांचा आमदार - राज पुरोहित

ब्रह्मदेव चट्टे- सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई, ता. 6 : मी व्यापाऱ्यांचा आमदार असून माझ्या तोंडात नेहमी व्यापारीच येतात. त्यामुळे मी व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजप आमदार राज पुरोहित यांनी आज विधानसभेत केले. ते संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर या विधयेकाच्या चर्चेत बोलत होते.

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारे राज पुरोहित यांनी आज या विधेयकावर भाष्य केले. आमदार पुरोहित यांना तालिका योगेश सागर यांनी विद्यापीठाच्या विधेयकावर चर्चा असल्याचे समजावले. भाजपच्या प्रतोदपदी निवड होत लाल दिवा मिळवलेल्या आमदार राज पुरोहित यांच्या या वक्तव्यावर विधानसभेतील आमदारांनी आक्षेप घेतला.

त्यावेळी सावरासावर करत राज पुरोहित म्हणाले, "मी देशातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचा आमदार असून मला सतत व्यापाऱ्यांचे हित दिसत असते. त्यामुळे या विधयेकावर बोलताना मला व्यापाऱ्यांची बाजू मांडावी लागेल. यावेळी तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी, " तुम्ही फक्त व्यापाऱ्यांचे आमदार नसून मतदार संघातील प्रत्येकाचे प्रतिनिधी आहात," असे सुनावले.

त्यानंतर याच चर्चेत मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सहभाग घेत, 'राज पुरोहित व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलत आहेत. व्यापार हा पुरोहित यांच्या मतदारसंघात होत असला तरी व्यापारी व पुरोहित हे माझ्या मतदारसंघात राहतात.
त्यामुळे ही चर्चा पुढे घेवून जावी लागेल,' असे सांगत राज पुरोहित यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख