अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा - डॉ. अमोल कोल्हे

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीच काय, तर मुख्यमंत्रीच व्हावे, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. पण याबातचा काय तो निर्णय पवारसाहेब घेतील, असे उत्तर अजितदादा उपमुख्यमंत्री होणार का प्रश्नावर राष्ट्रवादीचे शिरूरचे (जि.पुणे) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये दिले.
अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा - डॉ. अमोल कोल्हे

पिंपरीः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीच काय, तर मुख्यमंत्रीच व्हावे, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. पण याबातचा काय तो निर्णय पवारसाहेब घेतील, असे उत्तर अजितदादा उपमुख्यमंत्री होणार का प्रश्नावर राष्ट्रवादीचे शिरूरचे (जि.पुणे) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये दिले.

सीएए कायद्यातून भाजप हे राष्ट्रवादाला उन्मादी राष्ट्रवादाकडे नेत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला. मात्र, तो सर्वसामान्य भारतीयांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर सीएए कायदा करण्यात आल्याचा दावा खा. कोल्हेंनी केला. मात्र, जुन्या जखमांना फुंकर घालताना नव्याने त्या होणार नाहीत, हे पाहावे, असा सावधगिरीचा सल्ला त्यांनी केंद्राला यासंदर्भात दिला. शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आले असताना ते बोलत होते.राज्याची तिजोरी किती खाली व किती भरलेली आहे, हे पाहून दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय़ झाला असल्याने त्यांनी सांगितले. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांनी अभिनंदन केले. 

राज्य मंत्रीमंडळात कोणाकोणाची वर्णी लागेल, अजितदादा उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नाचे उत्तर पवारसाहेबच देतील, असे ते म्हणाले. पण,आपली काय इच्छा आहे,असे विचारताच कार्यकर्ता म्हणून, तर अजितदादांनी मुख्यमंत्रीही व्हावे अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणताच हास्यकल्लोळ झाला. अजितदादांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही राज्यातील कार्यकर्त्यांची मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com