i know all secretes who left ncp : Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादी सोडणाऱ्या सगळ्यांची 'अंडीपिल्ली' मला माहितीयत : अजित पवार

अमोल कविटकर
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : वर्ध्याच्या सभेवरुन समजले आहे की देशाची हवा बदलत आहे. भाजपची आश्वासने म्हणजे लबाडाघरची आवतने असून जेवल्याशिवाय खरी नाहीत, अशी स्थिती आहे, असा टोला लगावत अजित पवारांनी भाजपला लगावत पक्ष सोडणाऱ्यांना इशाराही दिला आहे. कोण, कशासाठी पक्ष सोडून गेले, हे मला सगळे माहिती असून गेलेल्या सगळ्यांची 'अंडीपिल्ली'ही मला माहिती आहेत, असेही पवार म्हणाले.

पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याआधी झालेल्या आघाडीच्या सभेत अजित पवार बोलत होते.

मोदी सरकारवर टीका करत पवार पुढे म्हणाले, वर्ध्याच्या सभेत पाच वर्षांपूर्वी काय आश्वासने दिली? याचे उत्तर मिळेल ही अपेक्षा होती. सव्वाशे कोटी जनतेचे पंतप्रधान जनतेबद्दल बोलतील असे वाटले होते. आमच्या कुटुंबाचे मी आणि माझी बहिण सुप्रिया बघेल. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळी वक्तव्ये केली जात असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावरीस म्हणताना लाज कशी वाटली नाही?

भाजपचा कारभार चांगला, मग पुण्यातील उमेदवार का बदलला, याचं उत्तर पुणेकरांना मिळायला हवे असे सांगून पवार म्हणाले, 'आम्ही पुणे ग्रामीण-शहर दोघांनाही पाणी द्यायचो. आता मात्र नियोजनाचा भोंगळ कारभार सध्या सुरू आहे. आता गरज असताना जनावरांच्या छावण्या नाहीत. ग्रामीण भागात टँकर नसताना भाजपला फक्त निवडणुका दिसतात का?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख