i have taken decision, tell dhanajay | Sarkarnama

`धनंजयला सांगा, माझा निर्णय झालाय`

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची बातमी आल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र उदयनराजेंनी 'धनंजयला सांगा माझा निर्णय झालेला आहे', असा निरोप मुंडे यांना पाठवला. ही माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

उदयनराजे यांच्यासह धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना मुंडे यांनी राजे हे राष्ट्रवादीतच असल्याचे सांगितले होते. माध्यमांतून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. मात्र या भेटीनंतर उदयनराजेंनी आपला निर्णय घेतला.

उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रथम वृत्त `सरकारनामा`ने दिले. उदयनराजे हे 15 सप्टेंबरपासून महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचे यात म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. ते वाचून मुंडे यांनी उदयनराजे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी राजेंनी त्यांना माझा निर्णय झाल्याचा निरोप पाठविला.  

ते भाजपात जातील असं वाटलं नव्हते, असे सांगत मुंडे यांनी सांगितले. रयतेची काळजी असलेले राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधव यांच्यावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. “भास्कर जाधव २०१३ मध्ये विचारत होते ठाकरेंचा व्यवसाय नाही मग त्यांचं उत्पन्न इतकं कसं? आज भास्कर जाधव यांना उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला पवारसाहेबांनी पद दिलं, सगळं दिलं. लोकांचा विकास तुम्ही केला नाहीत ही तुमची चूक की पक्षाची? ” असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख