बाळा नांदगावकर म्हणतात, "" राजसाहेबांच्या तोडीचा नेता आज कोणत्याच पक्षाकडे नाही !'' 

बाळा नांदगावकर म्हणतात, "" राजसाहेबांच्या तोडीचा नेता आज कोणत्याच पक्षाकडे नाही !'' 

पुणे : "आमच्याकडे राजसाहेब आहेत. त्यांच्या तोडीचा लोकप्रिय नेता आजघडीला कोणत्याही पक्षाकडे नाही,'' असे मनसेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळा नांदगावकर यांना वाटते. 

मनसेच्या कालच्या महामोर्चाने नांदगावकर हे काहीसे सुखावले आहेत. फेसबूकच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना "मेरे पास राज है' अशी भावना व्यक्त करीत विरोधकांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले,"" मनसेचा मोर्चा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला.

त्याचे श्रेय सर्व मनसे कार्यकर्त्यांना व देशप्रेमी नागरिकांचे आहे. आमच्या पक्षाकडे नगरसेवक, आमदार, खासदार आहेत. तुमच्याकडे काय असे हिणवणाऱ्यांना आजचा मोर्चा ही मोठी चपराक आहे. अशा लोकांना मी एवढेच सांगतो की आमच्याकडे राजसाहेब आहेत. त्यांच्या तोडीचा लोकप्रिय नेता आजघडीला कोणत्याही पक्षाकडे नाही. '' 

या पुढच्या काळात राजसाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने ताकदीने मार्गक्रमण करू, असेही नांदगावकर यांनी या पोष्टमध्ये म्हटले आहे. मोर्चा दरम्यान मुंबई पोलिसांनी खूप मेहनतीने सगळ्यांच्या सुरक्षिततेची घेतलेली जवाबदारी ही खरंच अभिनंदनीय अशीच होती. मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या माता भगिनींचे ही विशेष आभार, असे म्हटले आहे. 

आमची ताकद ही आमचे राजसाहेब व त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आहेत. आता आपल्याला पक्षवाढीवर व देशहितासाठी जे-जे करता येईल ते करण्यावर भर द्यायचा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com