विखेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार मला नाही : अशोक चव्हाण

विखेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार मला नाही : अशोक चव्हाण

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार मला नाही आणि त्यांचा राजीनामा कोणी मागितलेलाही नाही, असे स्पष्टीकरण काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे दिले.

गांधी भवन येथे काॅंग्रेस नेत्यांची लोकसभा निवडणुकीविषयी बैठकीपूर्वी ते बोलत होते. विखे पाटीलही या बैठकीला हजर होते. विखे यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काॅंग्रेसमध्ये असंतोष आहे. त्याबाबत चव्हाण यांनी हे स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले की राज्यात काॅंग्रेसच्या वाट्याला आलेल्या 26 जागांपैकी 5 जागांची घोषणा झाली आहे. उर्वरित जागांवर चर्चा होणार आहे. राजू शेट्टी यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. नगर जागेचा प्रश्न गंभीर आहे. मला राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार नाही. नगर जागा हा आजच्या बैठकीचा अजेंडा नाही. नगरची जागा देण्याची आमची मागणी होती पूर्ण होऊ शकली नाही, त्याचे दुःख आहे. मात्र या जागेचा राष्ट्रवादी काॅंग्रेसशी आघाडीवर परिणाम होणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

``प्रकाश आंबेडकर यांनीच आपले दरवाजे बंद असल्याचे सांगितले आहे. तरीही या आम्ही शेवटपर्यंत चर्चा करण्यासाठी तयार आहोत,असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर येथे लढण्यासाठी आमचे उमेदवार नाना पटोले हे हे सक्षम नेते आहे. तेथे निश्चित विजय आमचाच होणार आह, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com