माझ्याकडे जादू आहे ती प्रेमाची : दीपक केसरकर

i have magic of love dipak kshirsagar
i have magic of love dipak kshirsagar

सावंतवाडी : " माझ्याकडे जादू आहे ती प्रेमाची. याच्या जोरावर जगही जिंकता येते. ,'' असे मत पालकमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले. 

नगराध्यक्ष बबन साळगावकर हे माझे खरे राजकीय वारसदार होते; पण आता ते माझ्या शब्दातून मुक्त झाले असून, आता वारसदारही राहाणार नाहीत. माझ्याकडे जादूचे प्रेम आहे. या प्रेमाला ते जर जादूटोणा म्हणत असतील तर ते त्यांचे अज्ञान आहे. असे जोरदार प्रत्युतर केसरकर यांनी दिले.

नगराध्यक्ष साळगावकर यांनी मंत्री केसरकर यांच्यावर टिका केली होती. त्याला केसरकर यांनी प्रत्युतर दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थीत होते. 

ेकेसरकर म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्हयात विकास कामे होत आहेत. मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. तसा निधी हा नगरपालिकेला मिळत आहे; पण वादामुळे हा निधी मागे जाउ नये ही अपेक्षा आहे. यातून जनतेचे नुकसान होणार आहे.

मी आतापर्यत व्यक्तीगत टिका कधी ही कुणावर ही केली नाही आणि करणार पण नाही. त्यानी माझ्या साईबाबांच्या श्रध्देवर शंका घेतली आहे; पण त्याना माहीत नाही त्याचे एक तत्व श्रध्दा आणि सबुरी हे आहे. राजकारणात ते तत्व जपले पाहिजे. मग आपणास सर्व काही मिळते पण साळगावकर यांनी हे तत्व जपले नाही.'' 

राणेंशी लढाई यक्तीगत नव्हती 
आजपर्यंत मी कधीही स्थानिक राजकारणात ढवळा ढवळ केली नाही आणि करणार पण नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी माझी लढाई होती तेव्हा ती व्यक्तीगत नव्हती तत्वावर होती. आज विकासाशी लढाई आहे.जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढाई असल्याचेही केसरकर शेवटी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com