इतकी शांतता 92-93 च्या मुंबई दंगलीतही पाहिली नाही - राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या लॉकडाऊनची तुलना मुंबई दंगलीशी करीत `92-93 च्या दंगलीतही इतकी शांतता पाहिली नाही' असे सांगितले.
i had not seen such calmness during mumbai riot says raj thackeray i had not seen such calmness during mumbai riot says raj thackeray
i had not seen such calmness during mumbai riot says raj thackeray i had not seen such calmness during mumbai riot says raj thackeray

पुणे - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या लॉकडाऊनची तुलना मुंबई दंगलीशी करीत `92-93 च्या दंगलीतही इतकी शांतता पाहिली नाही' असे सांगितले. 

कोरोना संसर्गाने सर्वच जग पछाडले आहे. भारतातही गेल्या दहा दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पत्रकारांशी बोलत होते. 

लॉकडाऊन लोकांनी गांभीर्याने घ्यावा, असे सांगून त म्हणाले, की लॉकडाऊनचे दिवस वाढले तर त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होईल. कर मिळणार नाही. त्यानंतर सरकार चालवणेही कठीण होईल जाईल. शिस्त पाळली नाही तर आर्थिक संकट मोठे येणार आहे. लॉकडाऊन बंद होणार, की नाही कोणालाही माहिती नाही. लॉकडाऊन पाळताहेत त्यांच्या मनात भितीचे वातावरण आहे. नोकऱ्या राहतील का, रेशन मिळेल का, ही भिती आहे. शिस्त पाळत नाहीत, त्यांच्यामुळे या सर्व गोष्टी घडत आहेत.  असा प्रसंग यापूर्वी कधीही आला नव्हता. असं कधी बघितलं नव्हतं. जगभर एकच गोष्ट घडतेय, असं कुणी पाहिलेलं नाही. इतकी शांतता 92-93 च्या दंगलीतही पाहिली नव्हती.

तबलिघी जमात मरकजच्या लोकांच्या आक्षेपार्ह वागण्यावर राज ठाकरे यांनी कडाकडून हल्ला केला आहे. `असल्या' लोकांना गोळ्या घालून मारले पाहिजे, अशी कडवट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

मोदींच्या भाषणात लोकांना आशेचा किरण दिसायला हवा होता
पंतप्रधान मोदी यांच्या कालच्या भाषणात लोकांना आशेचा किरण दिसायला हवा होता, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांनी पाच एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील दिवे बंद करून मेणबत्ती लावा. टॉर्च लावा किंवा मोबाईल फ्लॅश दाखवण्याचे आवाहन केले आहे. त्याबाबत राज ठाकरे म्हणाले, की लोक 9 मिनिटे मेणबत्त्या लावतीलही. पंरतु, मोदींच्या भाषणात लोकांना आशेचा किरण दिसायला हवा होता. तर लोकांना समाधान वाटले असते. देश म्हणून कुठे चाललो आहोत, हे त्यातून कळायला हवे होते. 

सध्या लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, की लोकांच्या मनातील ही संभ्रमावस्था मोदींना संपवायला हवी होती. वैद्यकीय यंत्रणा कशी राबतेय, हे सांगायला हवे होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com