मोदींशी लढतोय पण मी त्यांचा द्वेष करीत नाही : राहुल गांधी

आम्ही लोकांचा द्वेष करीत नाही, ती आमची संस्कृती नाही.-राहुल गांधी
rahul_gandhi_narendra_modi
rahul_gandhi_narendra_modi

भुवनेश्‍वर :  " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि माझे मतभेद आहेत. मी त्यांच्याविरुद्ध लढेन आणि ते पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत यासाठी सर्व प्रयत्न करेन. पण मी त्यांचा द्वेष करीत नाही. त्यांची मते मला पटली नाही तरी त्यांचा मत मांडण्याचा अधिकार मला मान्य आहे,'' असे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

श्री. राहुल गांधी पुढे म्हणाले, " नरेंद्र मोदी कॉंग्रेस पक्षावर नाराज आहेत हे मी समजू शकतो. पण म्हणून आम्ही त्यांच्यावर रागावलेलो नाही. मोदी जेव्हा माझ्या विषयी अवमानकारक बोलतात तेव्हा त्यांचा राग मी मनात धरून ठेवत नाही. आम्ही लोकांचा द्वेष करीत नाही, ती आमची संस्कृती नाही.''

ते पुढे म्हणाले, " भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून माझ्याविरोधात जेव्हा अवमानकारक भाषेचा वापर होतो तेव्हा मी त्याकडे त्यांनी मला मोठी भेटवस्तू दिली असे पाहतो. मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या कारभारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अंकुश ठेवून आहे. सरकारच्या कारभारात त्यांचा हस्तक्षेप जागोजागी दिसून येत आहे.''

भाजपचे नेते आणि राहुल गांधींचे चुलत बंधू वरुण गांधी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचा अफवांबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले, " या अफवा अजून माझ्या कानावर पडलेल्या नाहीत.''

वरुण गांधी हे भाजपचे सुलतानपुरचे खासदार आहेत. त्यांच्या आई मनेका गांधी या केंद्रीय मंत्रिमंडळात महिला बालकल्याण मंत्री आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com