`आयुष्यभर स्मरणात राहील पवारसाहेबांचे केलेले सारथ्य

...
anil-deshmukh-sharad-pawar
anil-deshmukh-sharad-pawar

नागपूर : बहुमत नसताना भाजप सत्तेचे गणित मांडत बसले होते. मात्र, पवार साहेब अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला बाहेर पडले. पूर्व विदर्भाचा दौरा त्यांनी आखला. आपल्या सुदैवाने मुक्कामासाठी त्यांनी नागपूरची निवड केली आणि त्यांचे सारथ्य करण्याची संधी मला लाभली. त्यांच्या सान्निध्याचा ठेवा अत्तराच्या कुपीसारखा आपले आयुष्य सुगंधित करीत राहणार असल्याचे काटोलचे आमदार अनिल देशमुश शरद पवारांची आठवण सांगताना म्हणाले.

ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, जाणता राजा शरद पवार यांचे सारथ्य करण्याचे भाग्य आपल्याला लाभले. त्यांच्यासोबत घालविलेले दोन दिवस आयुष्यभर स्मरणात राहतील. पवार साहेबांची भन्नाट स्मरणशक्ती, वयाच्या ऐंशीतही कामाचा झपाटा, अद्ययावत माहिती, वाचन, कुठलेही किचकट राजकीय पेच सहज सोडवण्याची क्षमता सर्वकाही विस्मयकारकच आहे. एक माणूस इतक्‍या साऱ्या भूमिका कशा निभाऊ शकतो, याचेच आश्‍चर्य वाटते.

यंदाची विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अवघडच होती. देश आणि राज्यातील वातावरण बघता पुन्हा विरोधात बसावे लागेल, असे प्रत्येकाला वाटत होते. त्यात अनेकांनी सोयीने पक्ष सोडणे सुरू केले होते. त्यामुळे आता आपले काही खरे नाही, असे प्रत्येकालाच वाटत होते. मात्र, पवारसाहेब ठाम होते. ते डगमगले नाहीत आणि जराही विचलित झाले नाहीत, असे देशमुख यांनी सांगितले.

 ते म्हणाले, ``आपणच सत्तेवर येऊ असा ठाम विश्‍वास त्यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांना दिला. त्यांचा जोश आणि विश्‍वास बघून आम्हालाही हायसे वाटले. दुसरीकडे त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधक एकही संधी सोडत नव्हते. पवार यांच्यावर वैयक्तिक शाब्दिक हल्ले केले. त्यांच्या कुटुंबांचाही उद्धार केला. मात्र, काही फरक पडत नसल्याचे बघून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ऐन निवडणुकीत ईडीचा वापर केला. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. आता पुढे काय असा प्रश्‍न सर्वांना पडला. मात्र, पवारसाहेब डगमगले नाही. त्यांनी ईडी आणि सत्ताधाऱ्यांनाच आव्हान दिले. मीच तुमच्याकडे येतो, असे ईडीला सांगितले. कुठलेच आरोप सिद्ध करता येत नसल्याने अधिकारीसुद्धा घाबरले. आता काय करायचे त्यांना सूचत नव्हते. ईडीचा फेरा लावल्यामुळे राज्यभर असंतोष उफाळलाच होता. पवार साहेब ईडीच्या कार्यालयात आले तर राज्यभर अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, यामुळे अधिकाऱ्यांनीच माघार घेतली. पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवले. तुम्हाला येण्याची गरज नाही. तुमच्या येण्याने राज्यभरात कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होईल, असे त्यांना सांगून न येण्याची विनंती केली.जनतेच्या हितासाठी पवारसाहेबांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला. यानंतरही भाजपने नेत्यांची पळवापळवी कायम ठेवली. खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपात घेतले. तेव्हा त्यांना पराभूत करण्याचा ठाम निर्धार पवार यांनी व्यक्त केला. भरपावसात सभा घेतली आणि आपला निर्धार पूर्ण केला.``

बहुमत नसताना भाजप सत्तेचे गणित मांडत बसले होते. मात्र, पवार साहेब अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला बाहेर पडले. पूर्व विदर्भाचा दौरा त्यांनी आखला. आपल्या सुदैवाने मुक्कामासाठी त्यांनी नागपूरची निवड केली आणि त्यांचे सारथ्य करण्याची संधी मला लाभली. त्यांच्या सान्निध्याचा ठेवा अत्तराच्या कुपीसारखा आपले आयुष्य सुगंधित करीत राहणार आहे, असे आमदार देशमुख म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com