हे `असले' गद्दार मला अजिबात पक्षात नको आहेत - राज ठाकरे

"पक्षाच्या संदर्भातील अत्यंत वाईट आणि चुकीच्या बातम्या आपले काही पदाधिकारी वर्तमानपत्रांना आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांना पुरवताहेत. हे असले गद्दार मला अजिबात पक्षात नको आहेत,'' असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (ता. 15) पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात सुनावले.
I dont want traitors in party says raj thackeray
I dont want traitors in party says raj thackeray

औरंगाबाद : "पक्षाच्या संदर्भातील अत्यंत वाईट आणि चुकीच्या बातम्या आपले काही पदाधिकारी वर्तमानपत्रांना आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांना पुरवताहेत. हे असले गद्दार मला अजिबात पक्षात नको आहेत,'' असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (ता. 15) पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात सुनावले. 

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांशिवाय इतर कुणालाही बसू न देण्याच्या सूचना त्यांनी आयोजकांना करीत मुंबईला निघून गेले.

गुलमंडी येथील महावीर भवन येथे कार्यक्रम झाला. श्री. ठाकरे म्हणाले, ""मी काही जणांना सांगणार आहे. त्याप्रमाणे मला ती लोक सभागृहात नको आहेत. ती नावे मी आयोजकांना देणार आहे. उद्या जर वेळ पडली तर, मी त्यांना पक्षामध्येही ठेवणार नाही. आणि ह्याचे कारण म्हणजे, मला काही दिवसातल्या विशेषतः दोन दिवसातल्या ज्या बातम्या मिळाल्या आहेत, त्यात पक्षाच्या संदर्भातील अत्यंत वाईट आणि काही चुकीच्या बातम्या आपले काही पदाधिकारी वर्तमानपत्रांना आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांना पुरवताहेत, त्यांची नावेदेखील मला कळली आहेत.

दोन दिवसांत मी निर्णय घेईन की, त्यांना पक्षात ठेवायचे आहे किंवा नाही. हे असले गद्दार मला अजिबात पक्षात नको आहेत. मला या लोकांची गरज नाही. पत्रकार बांधवांनादेखील विनंती आहे की, हा आमचा पक्षांतर्गत विषय असल्यामुळे याच्यानंतरच्या बैठकीला आपण नाही थांबला तर, आनंद होईल. पुढच्यावेळी मी जेव्हा येईन, त्यावेळी आपल्याशी गप्पा नक्की मारीन.''

बैठकीला राज्य संघटक वसंत फडके, सुधीर पाटसकर, मनसे नेते अभिजित पानसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, जावेद शेख, सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी आदींची उपस्थिती होती. राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे गद्दारांना बैठकीला बसू दिले होते का? या प्रश्‍नावर जिल्हाध्यक्ष खांबेकर यांनी उत्तर टाळले. तसेच भाषणात सांगितले तशी कारवाई दोन दिवसांत होईल, असे स्पष्ट केले.

पक्षबांधणी सर्वांत महत्त्वाची
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत इतर मनसैनिकांचीही उपस्थिती होती. यावर राज ठाकरे यांनी मार्गदर्शन कार्यक्रमात केवळ जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, विभागअध्यक्ष, उपविभागअध्यक्ष, शाखा अध्यक्ष आणि इतर अंगिकृत संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी बसावे, इतरांना बाहेर घालवण्याच्या सूचना त्यांनी आयोजकांना दिल्या. निवडणुकी येतील, जातील पक्ष बांधणी महत्त्वाची असल्याचे सांगत मार्गदर्शन शिबिरासाठीही ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com