मी लहान मुलांशी कुस्ती खेळत नाही : शरद पवार

''आज कॉंग्रेस पक्षाच्या दिल्ली कार्यालयात धाड घातल्याची बातमी कानावर आली. निवडणुका म्हटलं की कामे चालणार. मात्र अशी घटना देशात आजपर्यंत कधीही घडली नाही. देशातील सत्ताधारी काय संदेश देऊ इच्छितात, हा कसा कारभार आहे? जनता कदापीही त्याला स्विकारणार नाही. जनतेला हे सर्व कळतय त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीला मोठे यश मिळेल,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.''आज कॉंग्रेस पक्षाच्या दिल्ली कार्यालयात धाड घातल्याची बातमी कानावर आली. निवडणुका म्हटलं की कामे चालणार. मात्र अशी घटना देशात आजपर्यंत कधीही घडली नाही. देशातील सत्ताधारी काय संदेश देऊ इच्छितात, हा कसा कारभार आहे? जनता कदापीही त्याला स्विकारणार नाही. जनतेला हे सर्व कळतय त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीला मोठे यश मिळेल,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
Sharad Pawar
Sharad Pawar

पिंपळगाव बसवंत : ''आज कॉंग्रेस पक्षाच्या दिल्ली कार्यालयात धाड घातल्याची बातमी कानावर आली. निवडणुका म्हटलं की कामे चालणार. मात्र अशी घटना देशात आजपर्यंत कधीही घडली नाही. देशातील सत्ताधारी काय संदेश देऊ इच्छितात, हा कसा कारभार आहे? जनता कदापीही त्याला स्विकारणार नाही. जनतेला हे सर्व कळतय त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीला मोठे यश मिळेल,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

आघाडीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आज पवार यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, राजाराम पानगव्हाणे, श्रीराम शेटे, हंसराज वडघुले, राजेंद्र डोखळे, तानाजी बनकर, दिगंबर गिते, राजेंद्र मोगल, दिपक बोरस्ते, सुभाष कराड आदी प्रमुख नेते यावेळी व्यासपीठावर होते. श्री. पवार यांनी केंद्रातील भाजप नेत्यांचे धोरण, राज्य सरकारच्या घोषणा व विधानसभा निवडणुकांत तापलेल्या राजकारणावर टिका केली.

मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतांना ते म्हणाले, ''मुख्यमंत्री म्हणताय निवडणुकीत मजा नाही. तेल लावून तयार आहे मात्र समोर पैलवान नाही. मी राज्यातील सर्व तालमींचा प्रमुख आहे. कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. जगातील क्रिकेट संघटनेचा देखील अध्यक्ष होतो. कुस्ती खेळतांना कुणाबरोबर कुस्ती खेळायची हे मी ठरवतो. लहान मुलांबरोबर कुस्ती खेळत नाही.''

''स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा करण्याची प्रक्रिया झाली. यामध्ये निझाम आणि काश्‍मीर यांनी नकार दिला. त्यातून काश्‍मीरची स्वायत्तता राखण्यासाठी 370 कलम जन्माला आले. ते रद्द केलं त्याला आमचा विरोध नाही. मात्र काही मत मांडलं तर देशद्रोही ठरवले जाते आहे. देशातील सर्व महत्वाच्या प्रश्नांवर उत्तर देत नाहीत. फक्त म्हणतात 370 कलमावर बोलतात. त्यामुळे अमित शहा यांची मला काळजी वाटते. रात्री झोपेतही ते 370 कलमाचा घोष करत असतील. त्यांची बायको काय म्हणत असेल? याची मला चिंता आहे. इथे शेती करणं अवघड झालंय, कोण मायचा पूत काश्‍मीरला जाऊन शेती करणार सांगा.'', असेही पवार म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, "नाबार्डच्या पत्रानुसार शिखर बॅंकेने आजारी कारखान्यांना आर्थिक मदत केली. त्यावरुन न्यायालयात तक्रार दाखल झाली. त्यात शरद पवार आणी या सर्व कारखान्यांचा संबंध आहे असं वाक्‍य या तक्रारीत असल्याने माझ्यावर 'ईडी'ने खटला केला. महाराष्ट्रातील कारखाने, संस्था असतील तर माझे संबंध तर असणारच ना?. त्यामुळे मी देखील बातमी वाचल्यावर 'ईडी' कार्यालयात येतो म्हटलं अन्‌ सरकार हलले. तेव्हा अधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे जाने टाळले. मात्र मी गेलो असतो तर महाराष्ट्र पेटला असता. आता निवडणूक संपल्यानंतर पाहुणचाराला 'ईडी' केव्हा बोलावंतय याची वाट बघतोय.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com